Devendra Fadnavis | Eknath Shinde | Farmer loan waiver
Devendra Fadnavis | Eknath Shinde | Farmer loan waiver Team Lokshahi
राजकारण

सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, प्रतिहेक्टर 13 हजार 600 रुपयांची मदत जाहीर

Published by : Shubham Tate

eknath shinde : राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होऊन महिना उलटल्यानंतर अखेर मंगळवारी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. मात्र, अपक्ष आणि मित्रपक्षांना सहभागी करून घेतलं नसल्यामुळे त्यावरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे. ‘प्रहार’ संघटनेचे बच्चू कडू यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. (eknath shinde Government big announcement for farmers, help of 13 thousand 600 rupees per hectare announced)

दरम्यान, नव्या मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. राज्यात 15 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना भाजप सरकारने विशेष बाब म्हणून आतापर्यंत कधीही नुकसान भरपाई मिळाली नाही तेवढी, म्हणजे एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जी मदत दिली जात होती त्याच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, तसच दोन हेक्टरची मर्यादा वाढवून आम्ही ती 3 हेक्टर केली असल्याची माहिती दिली आहे. हा एक मोठा निर्णय आम्ही घेतला आहे. एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे 6 हजार 800 मिळत होती. त्यापेक्षा दुप्पट मदत आम्ही देणार आहोत अशी देखील माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. म्हणजे प्रतिहेक्टर 13600 रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आहे.

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण