राजकारण

शिवसेनेचे डॅमेज कंट्रोल: मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक एकनाथ शिंदेंची भेट घेऊन मुंबईला रवाना

Published by : Team Lokshahi

विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस बाहेर येऊ लागली आहे. या निकालानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोन कालपासून नॉट रिचेबल आहे. त्यांच्यांसोबत 35 आमदारांचा गट असल्याच्या बातम्या येत आहे. यामुळे शिवसेना पक्ष प्रमुखांनी कठोर भूमिका घेत एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरुन हाकालपट्टी केली तर अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. दुसरीकडे शिवसेनेतील डॅमेज कंट्रोलची तयारी करण्यात आली असून शिंदे यांच्यांशी चर्चा करण्यासाठी मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक हे सुरतमध्ये दाखल झाले. अर्धा तास तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर ते नार्वेकर, फाटक मुंबईकडे रवाना झाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि आमदार रवींद्र फाटक (Ravindra Phatak) यांच्यावर शिंदे यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी सोपवली आहे. हे दोन्ही नेते सुरतला रवाना झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिंदे यांच्यासाठी त्यांच्याकडे निरोप दिला आहे. हा निरोप नेमका काय आहे, शिंदे माघार घेणार का, अशा अनेक चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

शिंदे दिल्लीला जाणार

शिंदे हे शिवसेनेच्या विरोधात बंडाच्या तयारीत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही टेन्शन नाही. ते रिलॅक्स मुडमध्ये सुरतमधील 'ली मेरेडियन' या हॉटेलमध्ये पुढचे निर्णय घेत आहेत. आता शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक पोहचण्यापुर्वीच ते दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शिवसेनेतील डॅमेज कंट्रोल अपुर्ण राहील.

उद्गीरमध्ये प्रियांका गांधींचा PM मोदींवर हल्लाबोल, म्हणाल्या; "पैशांच्या जोरावर महाराष्ट्रातील आमदारांना..."

Onion Export: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; केंद्राकडून कांदा निर्यातीला अखेर परवानगी

कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात PM मोदींची तोफ धडाडणार, फडणवीस म्हणाले; "कोल्हापूर असो किंवा महाराष्ट्रातील..."

'इंडिया' आघाडीवर फडणवीसांचं पुन्हा शरसंधान, कडेगावात म्हणाले, "राहुल गांधी, शरद पवार यांना..."

IPL Records : कोलकाता आणि पंजाबच्या सामन्यात पडला षटकारांचा पाऊस, टी-२० मध्ये 'या' ऐतिहासिक विक्रमाला घातली गवसणी