राजकारण

...म्हणून आम्ही गुवाहाटीला जात आहोत; एकनाथ शिंदेंनी सांगितले कारण

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटाचे आमदार व खासदारांच्या कुटुंबासह गुवाहाटीकडे प्रस्थान केले आहे. मुंबई विमानतळावरून सकाळी शिंदे गटाचे 178 सदस्य गुवाहाटीच्या दिशेने विशेष विमानाने जाणार आहेत. यावेळी मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. कामाख्या देवीच्या आशीर्वादाने राज्यात जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं आहे. म्हणून दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जात आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, कामाख्या देवीच्या आशीर्वादाने राज्यात जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं आहे. या देवीवर आमची श्रद्धा आहे. म्हणून दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जात आहे. तसेच, गुवाहाटी दौऱ्यासाठी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांनी निमंत्रण दिले होते, असे त्यांनी म्हंटले आहे. आम्ही हे सर्व राज्यासाठीच करतोय. यात आमचा काहीही अजेंडा नाही. राज्यातला जनतेला सुखी करण्याचे साकडे कामाख्या देवीकडे घालणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले आहे. यावेळी दलित पँथरच्या सुखदेव सोनवणे यांनी शिंदे गटाला समर्थन दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

दरम्यान, विमानतळावर शिंदे गटातील नेते दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. कामाख्या देवीच्या दर्शनाला हे कोणाचा बळी द्यायला चालले आहेत?, असा खोचक सवाल अजित पवारांनी विचारला होता. त्यावर महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येणाऱ्या विचारांचा बळी आम्ही कामाख्या देवीला देऊ, असा टोला केसरकरांनी पवारांना लगावला आहे.

घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, दोषींवर कारवाई करण्यासाठी CM शिंदेंनी दिल्या सूचना

T20 वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा घेणार निवृत्ती? हार्दिक पंड्याच्या निवडीबाबत मोठी अपडेट आली समोर

दिनविशेष 14 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मुंबई, ठाणे, रायगडला अवकाळी पावसानं झोडपलं! वादळी वाऱ्यामुळं घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं, ४ जणांचा मृत्यू

"राहुल गांधी तुम्ही पाकिस्तानला घाबरा पण आम्ही भाजपवाले आहोत", पालघरमध्ये अमित शहांचा इंडिया आघाडीवर घणाघात