राजकारण

उर्वशी रौतेलाचे नाव घेत राष्ट्रवादी नेत्याची राज्यपालांवर टीका; काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. अशातच, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची कोश्यारींवर टीका करताना जीभ घसरली आहे. राज्यपाल वासनांध होते. हा महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

हा महाराष्ट्र आणि मराठी माणूस राज्यपालांना कधीही माफ करणार नाही. राज्यपाल हे एखाद्या राजकीय पक्षाचे हस्तक असल्यासारखे वागले आणि पाहिल्या दिवसापासून घटनेची पायमल्ली करत राहिले. उर्वशी रौतेला हिला विमानातून घेऊन जाणे वगैरे प्रकारांमुळे ते वासनांध होते, हेही स्पष्ट होतं. मात्र, त्यांनी पंतप्रधान मोदींऐवजी राष्ट्रपती यांच्याकडे इच्छा व्यक्त करण्यास हवी होती, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा इन्स्टाग्राम पोस्टवरील एक व्हिडिओ मध्यतंरी चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबत दिसत आहे. उर्वशीने इंस्टाग्राम पोस्टवर लिहिले की ती आणि राज्यपाल गोव्याच्या दौऱ्यावर जात आहे. यावरुन राज्यपालांना ट्रोल करण्यात आले होते. उर्वशीला राज्यपालांच्या हस्ते स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Anil Desai: अर्ज भरण्यापूर्वी अनिल देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले...

Devendra Fadnavis : माझा उद्धवजींना सवाल आहे, तुम्ही केलेलं एक विकासाचं काम दाखवा

Rohit Pawar : देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर त्यात तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...