राजकारण

'जितेंद्र आव्हाडांवर सुडबुद्धीने विनयभंगाची कारवाई; राष्ट्रवादी त्यांच्या पाठीशी'

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर जाणूनबुजून व सुडबुद्धीने विनयभंगाची कारवाई करण्यात आली असून जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. कळवा-मुंब्रा उड्डाण पुलाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर श्रेयवादाची टिका केली होती. त्यातूनच ही कारवाई झाली आहे, असा आरोपही महेश तपासेंनी केला आहेत.

राज्यघटनेच्या संरक्षणार्थ आवाज उठवणारे लढवय्ये नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा शिंदे - फडणवीस सरकारने दाखल केला आहे. ज्या महिलेने व्हिडीओ दिला आहे तो मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे. त्यात इतकी गर्दी आहे की, स्वतः वाट काढत आणि पोलीसही त्यांना पुढे जाण्यासाठी सर्वांना बाजुला करत आहेत हे दिसत आहेत. त्यात ती महिलाही आहे. अशावेळी विनयभंगाचा गुन्हा होतो का हा जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे असेही महेश तपासे म्हणाले.

राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात जितेंद्र आव्हाड हे आवाज उठवत आले आहेत. भूमिका मांडत आले आहेत. त्यामुळे हात लावून कुणाला बाजूला केले असेल तर तो विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो का? याची माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आधी करुन घ्यावी असा सल्लाही महेश तपासे यांनी दिला आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्या आणि भाजपाच्या पदाधिकारी रिदा रशीद यांनी ट्वीटरवरुन एक व्हिडीओ शेअर करत आव्हाड यांनी चारचौघांमध्ये आपल्याला अपमानित केल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांसमोर मला अपमानित केलं. 'तू इथं काय करतेस' असं माझा हात पकडून म्हटलं. मी एक महिला असून अशाप्रकारे महिलेचा सर्वासामोर आपमान करण्यात आला आहे. पोलिसांनी याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी रशीद यांनी केली आहे. यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर जितेंद्र आव्हाडांनी थेट राजीनाम्याची घोषणा केली आहे. पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४, मी ह्या पोलिसी अत्याचारा विरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

Allu Arjun: मोठी बातमी! अभिनेता अल्लू अर्जुनविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Sanjay Raut : 'नियमाप्रमाणे मोदींनी राजकारणातून निवृत्त व्हावं', राऊतांचा खोचक टोला

Chandrashekhar Bawankule: मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर बावनकुळेंचा जोरदार हल्लाबोल

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा तातडीचा नाशिक दौरा,हेमंत गोडसेंसाठी शिंदे मैदानात

Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक