राजकारण

काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांकडून अडवणूक, सुरत पाकिस्तानात आहे का? नाना पटोले

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी न्यायालयीन कामासाठी सुरतमध्ये आले होते. पण, सुरत शहर व आपसासच्या परिसरात भाजपा सरकारने जुलूम व अत्याचार केले. सुरत शहरात कोणीही येऊ नये यासाठी पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांची बेकायदेशीरपणे धरपकड करत होते. मुंबई व महाराष्ट्रातून सुरतकडे जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांचीही गुजरात पोलिसांनी अडवणूक करुन दंडेलशाही केली, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

महाराष्ट्रातून सुरतला जाणाऱ्यांना सीमेवर अडवण्यात आले. सुरतमध्ये येणास पोलिसांची मनाई होती. सुरत व परिसरात कर्फ्युसारखी परिस्थिती दिसत होती. अनेक कार्यकर्त्यांचे फोन जप्त करण्यात आले होते. आय. डी. कार्ड जप्त करण्यात आले. व्हिडिओ रेकॉर्डिंगही करु दिले नाही. सुरत भारतात आहे का पाकिस्तानात असे चित्र दिसत होते. हा प्रकार लोकशाही संपुष्टात आणण्याचा आहे, अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.

काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनीही गुजरात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सुरत येथे जात असलेल्या राज्यभरातील नेते व कार्यकर्त्यांना गुजरात पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी अडवून ताब्यात घेतले, त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला हे निषेधार्ह आहे. गुजरात पोलिसांची वर्तणूक लोकशाहीची गळचेपी करणारी आहे.

राहुल गांधी हे देशासाठी, लोकशाही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवण्याची लढाई लढत आहेत. या लढाईत त्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सुरतमध्ये येत असताना गुजरात पोलिसांनी त्यांना महाराष्ट्राच्या सीमेवरच थांबवले. राहुल गांधींना या लढाईत जनतेची साथ मिळू नये याची जणू खबरदारीच गुजरात पोलिसांनी घेतली होती, याचा आम्ही निषेध करतो, असे थोरातांनी म्हंटले आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही गुजरात पोलिसांचा निषेध केला. सुरतला जाणार्‍या काँग्रेस कार्यकर्त्यांना अडविण्यात येत असल्याच्या बातम्या सकाळपासून येत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तर गदा आलीच आहे. आता मुक्त भ्रमणाचा अधिकार देखील काढून घेण्यात आला आहे की काय? असा संताप चव्हाण यांनी व्यक्त केला.

IPL मध्ये जॅक्सने दाखवली 'विल'पॉवर! ख्रिस गेलचा दहा वर्षांपूर्वीचा 'हा' विक्रम मोडला

Rahul Shewale: 'कॉंग्रेसच्या विचारांचा पराभव करायचायं' अर्ज दाखल करण्यापूर्वी शेवाळेंची प्रतिक्रिया

Harbour Local: हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; CSMT जवळ लोकलचा डबा घसरला

सोलापूरमध्ये PM नरेंद्र मोदींचं 'इंडिया'आघडीवर शरसंधान, म्हणाले; "देशाला भ्रष्टाचार, दहशतवादात..."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा; मुरलीधर मोहोळ म्हणाले...