राजकारण

अजित पवारांची संमेलनात जोरदार टोलेबाजी; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री काय टाळ वाजवताय का?

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये 18 वे जागतिक मराठी संमेलन पार पडत आहे. डॉ. डी वाय पाटील विद्यापीठात या संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भाषण झाले. यात अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अजित पवार म्हणाले की, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. यासाठी सुभाष जगताप काम करतात. तो जसा तापट आहे तसा मी पण तापट आहे. पुण्याचा पालकमंत्री असताना मी कधीही माझा दिवस चुकून दिला नाही. दर गुरूवारी सकाळी हजर असायचो. मी हे सांगतोय कारण आता चंद्रकांत पाटील पालकमंत्री आहेत. मी आपल्या जिल्ह्याचा साडेबारा वर्षे पालकमंत्री होतो. आता चंद्रकांत पाटील आहेत. शासकीय कार्यक्रम किंवा उद्घाटनासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची परवानगी घ्यावी लागते. काय हागलं मुतलं यांची परवानगी घ्यावी लागेल. काय ह्यांच्या घरचं आहे. कारण ह्यांना कोण अधिकारी बोलवत नाहीत, असे म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटलांना टोमणा मारला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बघा आणि महापालिकेला मतदान करा. मोदी साहेबांना बघा आणि बारामती नगरपालिकेला मतदान करा, असं कसं चालेल. तुमच्यात धमक असेल तर तुमच्या कामावर मत मागा. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. या समाजात सगळ्यांनी गुण्यागोविदानं राहिलं पाहिजे. साहेबांनी आम्हाला सांगितलंय. पुढची २५-५० वर्षांवर लक्ष ठेवून काम करा. नेतृत्वाला व्हिजन असल्याशिवाय विकास होत नाही. आता ही राहतोय की जातोय असे अधिकारी विचार करत असतात, असाही निशाणा अजित पवारांनी साधला आहे.

वेदांत फॉक्सकॉनचा मुद्दा आम्ही काढला तर तुम्हाला राग आला. यापेक्षा मोठा प्रकल्प आम्ही आणणार असं यांनी सांगितलं. यातून १.५० लाख नोकऱ्या गेला. दोन लाख कोटींचा हा प्रकल्प होता. ५-६ प्रकल्प बाहेर गेलंत. आता नवीनच बघतोय. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ महाराष्ट्रात आलेत. व मॅरेथॅान बैठका घेत आहेत. मग मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री काय टाळ वाजवताय का? महाराष्ट्र सदन तिकडे तिकडे बांधण्यापेक्षा नोकऱ्या आणा. सदन पण बांधा आणि नोकऱ्या पण आणा. नाहीतर पुन्हा म्हणतील अजित पवार यांचा राजीनामा घ्या, असा टोला त्यांनी लगावला आहे.

एक तर पठ्ठा बोलला शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. राज्यपाल काय बोलले की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे लग्न १३ व्या वर्षी झालं ते काय करत असतील. आपले पालकमंत्री तर काय बोलले की भीक मागत होते. ते म्हणू शकत होते की मागणी केली. निधी मागला. आता माझा फोटो तुडवला. ते मला लागणार आहे का? हे त्यांना वरून सांगितलं असल्याचे तुमच्याच माणसांनी मला सांगितलं, असे त्यांनी म्हंटले आहे.

आता पावसाळा संपला. थंडी आली घ्या आता निवडणुका. सरपंच लोकांनी निवडून द्यायचा, नगराध्यक्ष जनतेनं, मग महापौर का नको, मुख्यमंत्री का नको, पंतप्रधान पण लोकांमधूनच घ्या. ह्यांना सोप्प असलं तसंहे करतात, अशी जोरदार टीकाही अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा

Garlic: उन्हाळ्यात 'या' लोकांनी लसूण खाणे टाळावे

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...