राजकारण

ईशान्य म्हणजे जिगरचा तुकडा; पंतप्रधान मोदींनी केला 'त्या' तीन घटनांचा उल्लेख

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारावर विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत उत्तर दिले आहे. मोदी ईशान्येला देशाचा भाग मानत नाहीत, असे विरोधी पक्षांनी म्हंटले होते. याला उत्तर देताना मोदींनी तीन घटनांचा उल्लेख केला. दरम्यान, त्याआधीच पंतप्रधान मणिपूरवर बोलत नसल्याने विरोधकांनी सभात्याग केला होता.

मोदी म्हणाले की, 5 मार्च 1966 रोजी काँग्रेसने मिझोराममधील असहाय नागरिकांवर हवाई दलाकडून हल्ला केला होता. मिझोरामचे लोक भारताचे नागरिक नाहीत का? काँग्रेसने निष्पाप नागरिकांवर हल्ले केले होते. आजही 5 मार्चला संपूर्ण मिझोरममध्ये शोक व्यक्त करतो. काँग्रेसने हे सत्य लपवले आहे. जखम भरण्याचा प्रयत्न कधी केला नाही. यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. अकाल तख्तवरील हल्ल्याची आठवण सगळ्यांना आहे, पण असे हल्ले आधीच सुरू झाले होते.

दुसरी घटना 1962 ची आहे. चीनकडून देशावर हल्ले होत होते. लोकांना मदतीची अपेक्षा होती. अशा कठीण काळात पंडित नेहरू म्हणाले होते की, माझे हृदय आसामच्या लोकांसोबत आहे. नेहरूंनी तिथल्या लोकांना त्यांच्या नशिबावर जगायला सोडलं होतं. जे स्वत:ला लोहियांचे वारसदार मानतात. लोहिया यांनी नेहरूंवर आरोप करत म्हणाले होते की, नेहरू जाणूनबुजून ईशान्येचा विकास करत नाहीत. ती जागा सर्व प्रकारच्या विकासापासून वंचित राहिली आहे.

ज्या ठिकाणी लोकसभेच्या एक-दोन जागा होत्या त्याकडे काँग्रेसने लक्ष दिले नाही. पण आमच्यासाठी ईशान्य म्हणजे जिगरचा तुकडा आहे. ईशान्य, मणिपूरमधील सद्यस्थितीला काँग्रेसच कारणीभूत असल्याचा आरोप मोदींनी केला आहे.

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण; अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक

संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रोहित पवार यांनी ट्विट करत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा केला आरोप; म्हणाले...

Uddhav Thackeray : 4 जूनला आपल्या देशातलं जुमलापर्व संपतं आहे

काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...