राजकारण

भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! राम शिंदेंचे विखे पिता-पुत्रांवर गंभीर आरोप; रोहित पवारांना दिला छुपा पाठिंबा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अहमदनगर : जामखेड बाजार समितीच्या सभापती पदासाठी आज निवडणूक पार पडली आहे. यादरम्यान राष्ट्रवादी आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत बाजार समितीचे सभापती पदी भाजपचे शरद कारले तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे कैलास वराट विराजमान झाले आहे. अशातच, बाजार समिती सभापती निवडणुकीनंतर भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. राम शिंदे यांनी विखे पिता-पुत्रांवर गंभीर आरोप केले आहेत.

जामखेड बाजार समितीच्या सभापती पदासाठी रोहित पवार आणि शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. बाजार समिती निवडणुकीत दोन्ही गटाच्या 9-9 जागा आल्याने चुरस वाढली. तर रोहित पवारांच्या गटातील दोन संचालक अंकुश ढवळे आणि कैलास वराड यांनी सुजय विखेंची भेट घेतली होती. दोघेही विखेंचे कट्टर कार्यकर्ते मात्र रोहित पवार यांच्या पॅनल मधून निवडून आले होते. त्यामुळे विखे-पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर जामखेड बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकला असून चिठ्ठीतून झालेल्या मतदानातून शरद कारले बाजार समितीचे सभापती व उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे कैलास वराट निवडून आले आहे.

काय म्हणाले राम शिंदे?

याच पार्श्वभूमीवर राम शिंदे आक्रमक झाले असून विखे पिता-पुत्रांवर हल्लाबोल केला आहे. सभापती निवडीवरून विखेंनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना छुपा पाठिंबा दिला असल्याचा गंभीर आरोप राम शिंदे यांनी केला आहे. विखे कुटुंबीय ज्या पक्षात जातात त्या पक्षाच्या विरोधात काम करतात. भाजप पक्षाने आमदार, खासदार, मंत्री, महसूल मंत्री केलं अजून काय पाहिजे, अशा शब्दात त्यांनी विखे पिता-पुत्रांवर टीकास्त्र सोडले आहे. सभापती निवडीबाबत पक्षाच्या विरोधात काम केल्याने पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचेही राम शिंदे यांनी म्हंटले आहे.

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, आज आणि उद्या समुद्रकिणारी जाणं टाळावं, धोकादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."