राजकारण

औरंगाबाद का संभाजीनगर, इम्तियाज जलील व संजय शिरसाट आमने-सामने

Published by : Shweta Shigvan-Kavankar

औरंगाबाद : राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर औरंगाबाद (Aurangabad) शहराच्या नामांतराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. परंतु, यावरुन आता राजकारण रंगण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद का संभाजीनगर (Sambhajinagar) याविषयी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) व शिवसेना बंडखोर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे आमने-सामने आले आहेत.

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अखेरच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. परंतु, औरंगाबाद शहराच्या नावावरून आता वातावरण गरम होत असून इम्तियाज जलील व संजय शिरसाट यांच्यात वाद सुरु झाला आहे.

काय म्हणाले इम्तियाज जलील?

खासदार जलील म्हणाले की, मी जन्मलो औरंगाबादेत आणि मरणार पण औरंगाबादेत. माझ्या जन्माच्या दाखल्यावर औरंगाबाद नाव आहे आणि मृत्यू प्रमाणपत्रावरही शहराच नाव औरंगाबाद असणार. कुणी नेता 25 ते 30 वर्षांपूर्वी औरंगाबाद येथे आला होता आणि त्याने इच्छा व्यक्त केली होती की शहराच नाव बदलावं तर हे शहरवासियांच्या भावनांशी खेळल आत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

संजय शिरसाट यांचे प्रत्युत्तर

यावर आमदार संजय शिरसाट हे चांगलेच भडकले असून जलील काय शहराचा बादशाह आहे का? कोण तो इम्तियाज जलील. उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला असल्याने शहराचे नाव संभाजीनगर होणार. कितीही आडवे आले तर त्यांना आडवे करण्याची ताकत ठेवणारे आहेत. मात्र, शहराच नाव संभाजीनगर करणारच, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, अनेक वर्षे नामकरणाला विरोध करणारा काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत असताना प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने औरंगाबादेतील काँग्रेसमधील मुस्लिम पदाधिकाऱ्यांमध्ये संताप आणि नाराजी आहे. यामुळे औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्षांसह शहर काँग्रेसच्या तब्बल 200 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा

"३७० कलम हटवलं पण दहशतवाद अजून संपला नाही", सांगलीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“..तर पुढच्या वेळी आम्हाला काळे झेंडे दाखवा”, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भोरच्या सभेत स्पष्टच सांगितलं