राजकारण

शिंदे सरकारची जीभ दिल्लीला गहाण ठेवलीये का? राऊतांचे टीकास्त्र

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंची तोफ बंडखोरांच्या बालेकिल्ल्यात आज धडाडणार आहे. बुलढाण्यातील जिल्ह्यातील चिखली येथे उध्दव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. याबाबतची माहिती संजय राऊत यांनी दिली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही जोरदार निशाणा साधला आहे. वादग्रस्त विधानांवर सरकार गप्प बसलयं. सरकारची जीभ दिल्लीला गहाण ठेवलीये का, असा सवाल राऊतांनी शिंदे फडणवीस सरकारला केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, उध्दव ठाकरे बुलढाण्यात शेतकऱ्यांच्या भेटीला जाणार आहेत. महाराष्ट्रात या सरकारच्या शेतकऱ्यांना ते काही बरा वाट परिणाम होत नाही. पण, ठाकरे हेच खरे सरकार आहे. आणि आम्ही सगळे आज उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली बुलढाण्यामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधाणार आहे. यानंतर जाहिर सभा आहे. यावेळी अनेक विषयांवर उध्दव ठाकरे आपल्या भूमिका मांडणार आहे.

विशेषतः महाराष्ट्राचा अपमान, कर्नाटकचे मुख्यमंत्री, छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते सुध्दांशु त्रिवेदी या सगळ्यांचा समाचार उध्दव ठाकरे घेणार आहेत. महाराष्ट्रातून आताही अनेक राजकीय पक्ष, विरोधी पक्ष यांचा पाठिंबा मिळत आहेत. आत्ताच भारती जय हिंद पार्टीने पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात या सरकारविरोधात संतप्त वातावरण आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

विदर्भातील आजची सभा ऐतिहासिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वीरपुरुष ज्या मातेने आम्हाला दिलाय त्या राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या भूमीमध्ये आजची सभा आहे. या भूमीमध्ये फक्त निष्ठा आणि इमान याचेच बीज रोवले गेले आहे. येथे बेईमांना लोक अजिबात थारा देणार नाही, अशीही टीका संजय राऊतांनी शिंदे गटावर केली आहे.

तर, राज्यात वादग्रस्त विधानांची मालिका सुरु आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, राज्यपालांच्या बाबतीत सरकार गप्प बसलयं, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, सांगली खेचून घेण्याची भाषा केली तरी शिंदे सरकार तोंड शिवून बसलयं. आणि आता रामदेव बाबासारखे भाजपचे महाप्रचारकाने हे महिलांविषयी असे उद्गार काढले तरी सरकार गप्प बसलयं. सरकारची जीभ दिल्लीला गहाण ठेवलीये का, असा सवाल राऊतांनी शिंदे फडणवीस सरकारला केला आहे.

दरम्यान, जिल्ह्याच्या चिखली येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. ही सभा विदर्भातील पहिलीच सभा आहे. जिल्ह्यातील शिवसेनेतून फुटून शिंदे गटात गेलेले बुलढाणा आणि मेहकर येथील आमदार आणि खासदार हे शिंदे गटात गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या या सभेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे आजच्या सभेत उद्धव ठाकरे कुणावर काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेच्या यशस्वीतेवर जिल्ह्याच्या शिवसेना आणि शिंदे गट यांचे जिल्ह्यातील राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

RBL Bank: आरबीएल बँकेची 12 कोटींच्या फसवणूक केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांसह 11 जणांवर गुन्हा दाखल

ओबीसी बहुजन पार्टीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी-शिवीगाळ केल्याचा प्रकाश शेंडगे यांचा आरोप

RR VS LSG: सॅमसन आणि जुरेल यांनी केली नाबाद अर्धशतके! राजस्थानने लखनौचा 7 गडी राखून केला पराभव

IPL 2024 : मुंबई इंडियन्सविरोधात मॅकगर्क-स्टब्सचा झंझावात! शेवटच्या चेंडूवर दिल्लीनं जिंकला रंगतदार सामना

भाजपने मुंबई उत्तर-मध्य लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "राजकारणातून..."