राजकारण

राज्यपालांना हटवा अन्यथा जोडे कसे मारतात हे शिवसेना दाखवून देईल; राऊतांचा इशारा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात वादंग उभे राहिले आहे. यावर विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. तर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. व मुख्यमंत्र्यांनी भाजपचा निषेध केला पाहिजे. राज्यपालांना हटविण्याची मागणी केली पाहिजे, नाहीतर जोडे काय असतात. आणि कसे मारले जातात हे शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला आहे.

संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा अत्यंत दळभद्री विधान केले आहे. यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा एकदा दुखावला गेला आहे. याचवेळी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी राष्ट्रीय वाहिनीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली असे विधान केले आहे. ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

राज्यपलांनी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान व संभाजी राजांचा अपमान करायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा कधी माफी मागितली हे आज महाष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले पाहिजे. कारण ते भाजपचे आता सहयोगी आहेत. वीर सावरकरांच्या संदर्भात आपण रस्त्यावर उतरलात स्वागत आहे, जोडे मारले स्वागत आहे. हे जोडे आता तुम्ही कोणाला मारणार आहात. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांना का राज्यपालांना मारणार आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

जर छत्रपतींनी माफी मागितली तर पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येऊन शिवरायांचा जयजयकार का करतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ भारतीय नौदलाला जे बोधचिन्ह कशाकरीता दिलंय? अफझल खान आणि औरंगजेबाच्या कबरी तोडण्याची नाटके कशाकरीता करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी शिवसेना फोडली. ते स्वाभिमानाचे तुणतुणे वाजवत भाजपबरोबर गेले. आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला. वादग्रस्त वक्तव्य करुन 72 तास झाले तरी त्यांच्या 40 लोकांनी यावर साधा निषेधही केला नाही. इतके तुम्ही घाबरतय, असे त्यांनी म्हंटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे होता. आम्ही महाविकास आघाडीमध्ये गेलो म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला आणि तुम्ही पक्ष सोडला. इथे तर भाजपच्या राज्यपालांनी अधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना माफीवीर म्हंटलयं तरीही तुम्ही सत्तेला चिटकून बसलेला आहात. महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतोय, अशा शब्दात त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी भाजपचा निषेध केला पाहिजे. व महाराष्ट्र सरकारने राज्यपालांना हटविण्याची अधिकृत मागणी केली पाहिजे. नाहीतर जोडे काय असतात. आणि कसे मारले जातात हे शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.

प्रसिद्ध गायक नंदेश उमप निवडणुकीच्या रिंगणात

Devendra Fadnavis : कार्यकर्त्यांची नाराजी अनेकवेळा असते, आम्ही सगळे मिळून ती नाराजी दूर करु

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा; कांद्यावरील निर्यातबंदी हटवली

नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात; राज ठाकरेंची आज कणकवलीत सभा

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य