राजकारण

जे करायचे ते रणांगणात; सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांना इशारा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सांगली - माझी सवय आहे, जे काय करायचं ते रणांगणात आणि प्रत्यक्ष लढाई असते, त्यावेळी आम्ही मैदानात कसं उतरतो ते सगळ्यांनी बघितले आहे, अशा शब्दात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी (Satej Patil) अप्रत्यक्ष इशारा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आणि कोल्हापूरच्या भाजपाला (BJP) दिला आहे. तसेच आजपर्यंतच्या जनतेतून ज्या निवडणूका झाल्या त्याचा कल स्पष्ट झाला आहे, असा खोचक टोलाही अप्रत्यक्ष महाडिक गटाला लगवला आहे. ते सांगली मध्ये बोलत होते.

सतेज पाटील यांनी राज्यसभा निवडणुकीतील पराभवावर भाष्य करताना भाजपा आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या महाडिक गटाला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. चंद्रकांत पाटील यापुढे विधानपरिषदेतील सर्व उमेदवार निवडून येणार असल्याचं विधान केला आहे. त्यावरून बोलताना सतेज पाटील म्हणाले, एका यशामुळे आता तसेच यापुढे घडणार आहे, अस चंद्रकांत पाटलांना वाटत असेल. तर तसे काही घडणार नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीकडून सर्व ती खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे.

तसेच धनंजय महाडिक यांच्या राज्यसभेतील विजयावरून बोलताना मंत्री पाटील म्हणाले, लोकशाहीत स्वातंत्र्य असते त्यावर आपण जास्त भाष्य करणार नाही. पण, आपण जे काय करतो ते रणांगण आल्यावर करतो. आता कोणत्याही निवडणुका जवळ आहे आणि लढाई आले की आपण मैदानात कसे उतरतो हे सगळ्यांनाच माहित आहे, अशा शब्दात कोल्हापूर भाजपाला आणि नूतन खासदार धनंजय महाडिक गटाला मंत्री पाटील यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

देहू येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समारंभा दरम्यान कउपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू दिलं नाही यावरून बोलताना मंत्री पाटील म्हणाले, नेमकं त्या ठिकाणी व्यासपीठावर काय घडलं हे आपल्याला माहीत नाही. पण, जर जाणून-बुजून उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रोटोकॉलनुसार भाषण करण्यापासून अडवण्यात आले असेल तर ते महाराष्ट्राच्या दृष्टीने दुर्दैवी आहे, असे मत सतेज पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Kartiki Gaikwad: लग्नाच्या चार वर्षांनी कार्तिकी झाली आई

Bhandara : भंडारा शहरातील खड्यात रांगोळी काढून आंदोलन

Chhagan Bhujbal : अनधिकृत होर्डींग लावणारे भावेश भिडे ठाकरेंच्या जवळचे असल्याचा आरोप, भुजबळांची प्रतिक्रिया

Hoarding Collapse Mumbai: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे पालिका प्रशासनाची अनधिकृत होर्डिंग्सवर धडक कारवाई

Ravindra Dhangekar: आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल! नेमकं कारण काय?