राजकारण

'आव्हाडांनी औरंगजेबाचे मंदिर उभारावे अन् उदघाटनाला अजित पवार, उद्धव ठाकरेंना बोलवावे'

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवारांची पाठराखण करताना जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रूर नसल्याचे म्हंटले होते. यावरुन आता राजकीय वातावरण तापले असून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आव्हाडांवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी आता औरंगजेबाचं मंदिर उभारावं आणि उदघाटनाला अजित पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना बोलवावे, असा टोला म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाडांना लगावला आहे.

नरेंद्र म्हस्के म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे कायमच आपल्या सोयीने इतिहास मांडतात. औरंगजेबाला क्रूरच होता. त्यामुळेच संभाजीराजेंचे अतोनात हाल करत त्यांची हत्या केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कायमच हिंदू धर्माचा अपमान केला जातो. छत्रपती संभाजी महाराजांनी मुस्लिम धर्म स्वीकारला नाही त्याऐवजी आपल्या प्राणांची आहुती दिली. मग त्यांना धर्मवीर का म्हणायचं नाही? जितेंद्र आव्हाडांनी आता औरंगजेबाचं एक मंदिर बनवावं आणि उद्घाटन करायला अजित पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना बोलवावं, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचे मंदिर होते. ते औरंगजेबाने तोडलं नाही, तो क्रूर असता तर त्याने विष्णूचं मंदिर तोडलं असते, असे आव्हांनी म्हंटले होते. विधाना चुकीचे असल्याचे लक्षात येताच जितेंद्र आव्हाडांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन सारवासारव केली.

Avinash Jadhav : मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Rahul Gandhi : रायबरेलीतून राहुल गांधी यांना उमेदवारी जाहीर

मंधाना-शेफालीचा धमाका! टीम इंडियाची विजयी हॅट्ट्रिक; बांगलादेशचा धुव्वा उडवून T20 मालिका जिंकली

"धेर्यशील माने किंवा इतर उमेदवार महत्त्वाचे नाहीत, कारण...", हातकणंगलेत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं