राजकारण

'ठाण्यात दिघे कुटुंबात उद्धव ठाकरेंनी फूट पाडली'

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मंगेश जोशी | जळगाव : कुटुंबात वाद निर्माण करण्याची सुरुवात उध्दव ठाकरे व मातोश्रींनी केली असल्याची बोचरी टीका पाचोर्‍याचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी केली आहे. ठाकरे गटाच्या पाचोऱ्यातील सभेनंतर किशोर पाटील यांनी उध्दव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. कुटुंबात फूट पाडण्याचे पाप उद्धव ठाकरे कुठे भरणार? असा सवालही आमदार किशोर पाटलांनी उपस्थित केला आहे. ते आज जळगावात माध्यमांशी बोलत होते.

पाचोर्‍यात माजी आमदार स्वर्गीय आरो तात्या पाटील यांचा राजकीय वारसदार मी असताना उद्धव ठाकरेंनी माझ्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांना तात्यांचे राजकीय वारसदार केले. ज्या वैशाली सूर्यवंशी यांनी गेल्या 25 वर्षात कधीही माझ्या किंवा आपले वडील आरओ तात्या पाटील यांचा कधीही प्रचार केला नाही व कुठलाही राजकारणाशी संबंध नसताना वैशाली सूर्यवंशी यांच्यातील शिवसैनिक अचानक कसा जागृत झाला हा देखील संशोधनाचा विषय असल्याचे म्हणत किशोर पाटलांनी आपल्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

कुटुंबात वाद निर्माण करण्याची सुरुवात उद्धव ठाकरे व मातोश्रींनी केली. ठाण्यात दिघे कुटुंबात तर पाचोऱ्यात माझ्या कुटुंबात उद्धव ठाकरेंनी फूट पाडली असून कुटुंबात फूट पाडण्याचे पाप उद्धव ठाकरे कुठे भरणार? अशी टीका किशोर पाटलांनी केली आहे.

दरम्यान, पाचोऱ्यातील निर्मल सिड्स कंपनीत माजी आमदार आर ओ पाटील यांचा ११ फूट पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उद्धव ठाकरेच्या हस्ते झाले. यानंतर त्यांची पाचोरा येथे सभा झाली असून उध्दव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. या सभेला जमलेली गर्दी पाहिल्यानंतर हे कळतं की शिवसेना कुणाची आहे. पाकिस्तान सुद्धा सांगेल की शिवसेना कुणाची आहे. पण आपल्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला हे कळत नाही, असे उध्दव ठाकरे यांनी म्हंटले होते

'प्रकाश आंबेडकर धनदांडग्यांच्या पाठिशी' प्रकाश शेंडगे यांची टीका

Uddhav Thackeray : 'मोदींवर संकट आलं तर मीही मदतीला धावून येईन, पण...', ठाकरेंचा PM मोदींना टोला

Loksabha Election 2024 : देशभरातील 12 राज्यांतील 94 जागांसाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, आज आणि उद्या समुद्रकिणारी जाणं टाळावं, धोकादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना