राजकारण

शरद पवारांची निवृत्तीची घोषणा! शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. यामुळे राज्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली असून यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनीही पवारांच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे फार मोठे नेते आहेत. कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्यासमोर खूप छोटा माणूस आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. तर, राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरही म्हस्केंनी टीका केली आहे.

शरद पवार हे फार मोठे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या घामातून व कष्टातून त्यांनी तयार केलेला आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे नाहीतर देशाचे मोठे नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्यांचा आदर ठेवतात. आणि कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्यासमोर खूप छोटा माणूस आहे. मी स्वतःला त्यांच्या पायाची धूळ समजतो, असे नरेश मस्के यांनी म्हंटले आहे. तर, राष्ट्रवादीचे स्वयंघोषित सुभेदार जे स्वतःला समजतात. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणजे माझी पर्सनल प्रॉपर्टी आहे. मी सांगेन बस म्हणजे बसायचं, उठ म्हणजे उठायचं. अशा पद्धतीने कोणत्याही पक्षाचा नेता असेल तर कार्यकर्ता टिकत नाही, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे.

दरम्यान, शरद पवारांनी निर्णयाची घोषणा करताच सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला. अनेक नेते व कार्यकर्ते भावूक झाले. साहेब निर्णय मागे घ्या, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. कार्यकर्ते सभागृहाबाहेर थेट उपोषणावर बसले आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांनीही कार्यकर्त्यांशी संवाद साधत चर्चेचे आवाहन केले. मात्र, कार्यकर्ते कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नसून जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

Nanded : नांदेडमध्ये आयकर विभागाचे छापे, संचालकाच्या घराची झाडाझडती सुरु

Summer Drinks: उन्हाळ्यात आवर्जून प्या 'हे' पेय

खासदार अमोल कोल्हे यांचा मालिका विश्वातून पुढील पाच वर्षांसाठी ब्रेक

Padma Award 2024: महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल आला समोर; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...