राजकारण

ठाकरे गट - शिंदे गटाचे भवितव्य ठरणार; आमदार अपात्रतेचा निकाल कुणाच्या बाजूने लागणार?

Published by : Siddhi Naringrekar

शिवसेना कुणाची आणि ठाकरे की शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार, याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल आज फैसला होणार आहे. यामुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या आमदारांचे भवितव्य आज ठरणार आहे.

विधानसभा अध्यक्ष विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये निकाल वाचन करणार असल्याचे सांगितले जात आहे. १४ सप्टेंबर ते २० डिसेंबरदरम्यान झालेल्या मॅरेथॉन सुनावणीनंतर सुमारे ५०० पानांचे निकालपत्र तयार होत असल्याची माहिती मिळत आहे.

आज दुपारी 4 नंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याबाबत निकाल देणार आहेत.सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार आहे. निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

GT vs CSK : शुबमन गिलच्या नावावर 'या' जबरदस्त विक्रमाची नोंद, अहमदाबादच्या मैदानात पाडला धावांचा पाऊस

"आम्ही पक्ष फोडत नाहीत, घरही फोडत नाहीत, पण..." पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलिसांच्या कार्याला सलाम, पोटच्या गोळ्याला सांभाळत बजावते आपलं कर्तव्य....

रोहित पाटलांचा राष्ट्रवादीसह अजित पवारांवर हल्लाबोल

पंकजा मुंडेंच्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मोठं विधान; म्हणाले, "मराठवाड्याचा मागासलेपणा..."