राजकारण

सर, मोठ्या धाडसाने लिहितेय...; सुषमा अंधारेंचे शरद पवारांना खुले पत्र

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. अशातच, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी शरद पवार यांना खुले पत्र लिहीले आहे. एकूणच महाराष्ट्र आणि देश ज्या संक्रमण काळातून जात आहे त्या संक्रमण काळात हुकूमशाही आणि दमण यंत्रणेच्या विरोधात लढण्यासाठी महाराष्ट्राला एका ज्येष्ठ बुजुर्गाचे नुसते आशीर्वादच नाही तर मुत्सद्दी राजकारणाचा अनुभव आणि दिशादर्शक मार्गदर्शनही हवे आहे, असे सुषमा अंधारेंनी म्हंटले आहे.

काय आहे सुषमा अंधारेंचे पत्र?

खरंतर मी आपल्याला लिहावे किंवा सांगावे एवढी प्रज्ञा निश्चितच माझी नाही. पण तरीही सर, मोठ्या धाडसाने हे लिहिले पाहिजे. मी आपल्या पक्षाची कधीच साधी प्राथमिक सदस्यही नव्हते. पण आपला निर्णय एकूणच फक्त पक्ष म्हणुनच नाही तर, महाराष्ट्रातील बहुजन उपेक्षित तळागाळातील अठरापगड जातीची बूज असणारा नेता म्हणून ज्यांना जाण आहे त्या कोणालाही मानवणार नाही. बदल हा सृष्टीचा नियम असतो जे काल होते ते आज असेलच असे नाही जे आज आहे. ते उद्या राहीलच असे नाही. पण, असे असले तरी काही गोष्टीत लोकांना बदल अजिबातच मान्य नसतो. महाराष्ट्राच्या बुजुर्ग व्यक्ती म्हणून आपला हा निर्णय अजिबातच न पटणारा आहे.

कदाचित आपल्या नंतर आपल्या पक्षाला अध्यक्ष मिळतील आणि ते खूप निष्ठेने आणि प्राणपणाने पक्ष वाढीसाठी काम करतील ही पण, माझ्यासारखी अत्यंत तळागाळातून आलेली मुलगी असेल, मोतीराज राठोड असतील, व्यंकप्पा भोसले असतील, इचलकरंजीचे पवार असतील, निलंग्याचे विलास माने असतील ही माणसं आपण उभी केलीत. कुणी काहीही म्हटलं तरी रामदास आठवले हे नेतृत्व पहिल्यांदा आपल्या पारखी डोळ्यांनी हेरले. आपल्या पुढाकारामुळेच पहिल्यांदा आंबेडकरी चळवळीतले चार खासदार एकत्रितपणे निवडून आले.

एकीकडे ना.धो. महानोर यांच्यासारखे शेतीमातीशी नाळ असणारे जाणकार साहित्यिक आपल्या सभागृहात असले पाहिजे तर दुसरीकडे तीन दगडाच्या चुलीवरचे अन्न शिजवून खाणारे आणि जन्मभर भटकंती केली तरी मेल्यावर स्मशानभूमीचा प्रश्न उरावा अशा भीषण दुर्भिक्षातून उभे राहिलेले लक्ष्मण मानेंसारखे लोकही सभागृहात असावे हा सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग आपण केला. कोणताही पक्ष किंवा संघटना चालवण्यासाठी चार गुणांची चतुसूत्री एकत्र असणे अत्यंत गरजेचे असते. एक नेतृत्व, दोन वक्तृत्व, तीन विचारधारा, चार संघटन कौशल्य. आपल्या ठायी या चारही गुणांचा संगम आहे हे सत्य महाराष्ट्रात काय भारतातला कोणीही नाकारता येणार नाही.

शतकातला नेता म्हणूनही आपला एक वेगळा उल्लेख आहे. आपल्या निर्णयाने राष्ट्रवादी पक्षाचे काही नुकसान होत आहे का किंवा आपल्यानंतर या पक्षाचे नेतृत्व करण्यास कुणी सक्षम आहे किंवा नाही या सगळ्या बाबींमध्ये जाण्याची अजिबातच इच्छा नाही. पण, आपला अनुभव प्रश्न हाताळण्याचे हातोटी, कमालीचा संयम या सगळ्यांची आज गरज आहे. एकूणच महाराष्ट्र आणि देश ज्या संक्रमण काळातून जात आहे त्या संक्रमण काळात हुकूमशाही आणि दमण यंत्रणेच्या विरोधात लढण्यासाठी महाराष्ट्राला एका ज्येष्ठ बुजुर्गाचे नुसते आशीर्वादच नाही तर मुत्सद्दी राजकारणाचा अनुभव आणि दिशादर्शक मार्गदर्शनही हवे आहे, असे सुषमा अंधारेंनी म्हंटले आहे.

निवडणूक आयोगाला फटकारणाऱ्या उद्धव ठाकरेंना उपमुख्यमंत्री फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर, ट्वीटरवर म्हणाले, "त्यांचा पराभव स्पष्टपणे..."

Daily Horoscope 21 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या धन-संपत्तीत होणार बक्कळ वाढ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 21 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"मोदी पराभवाच्या भीतीमुळं निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा करतात"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

IPL 2024 Play Offs : प्ले ऑफचा सामना पावसामुळं रद्द झाल्यास पुढे काय होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती