राजकारण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रात्री उशिरा पुण्यात; नेमकं कारण काय?

Published by : Siddhi Naringrekar

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रात्री उशिरा पुण्यात दाखल झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचं काल पुण्यात निधन झालं. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात दाखल झाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा पुण्यात दाखल झाले आहेत. यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंत्यदर्शनाला उपस्थित राहणार आहेत.

अमित शाह यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक श्री मदनदास देवी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. मदनदास देवी यांच्या निधनाने संघटनेची न भरून येणारी हानी झाली आहे.निस्वार्थ भावनेने त्यांनी राष्ट्रसेवा व संघ कार्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं.

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण; अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक

संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रोहित पवार यांनी ट्विट करत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा केला आरोप; म्हणाले...

Uddhav Thackeray : 4 जूनला आपल्या देशातलं जुमलापर्व संपतं आहे

काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...