राजकारण

उध्दव ठाकरेंचे 'ते' विधान दुर्देवी; विनोद तावडेंची प्रतिक्रिया

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस आहे. त्यानिमित्त भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्या हस्ते नागपूरच्या भाजप कार्यालय टिळक पुतळा येथे झेंडावंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. भारतीय जनता पक्षाने या देशातल्या घराणेशाही राजकारण एक फुल स्टॉप दिला आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या 43 व्या स्थापना दिनानिमित्त प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला हे मनात फक्त ठाऊक आहे की भाजपा हा सत्तेसाठी नाही. तर सत्ताही समाज परिवर्तनासाठी साधन आहे. आणि हे परिवर्तनाचा काम गतीने होण्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा पूर्ण झोकून देऊन काम करेल.

विशेषतः भारतीय जनता पक्षाने या देशातल्या घराणेशाही राजकारण एक फुल स्टॉप दिला आहे. घराणेशाहीमुळे हुकुमशाहीला पूर्णविराम दिला आहे. राजकारणामध्ये जे भ्रष्टाचाराचे मोठ मोठे आरोप सत्ताधाऱ्यांवर व्हायचे. गेल्या नऊ वर्षांमध्ये असा कुठलाही आरोप केंद्रातील राजकारणात कुणावरही नाही. भ्रष्टाचारविरहीत सत्ता देता येते हे भाजपने सिद्ध केले. तरीदेखील विरोधकांचा सातत्याने भाजपला विरोध करणे चालू ठेवले आहे, असे विनोद तावडे यांनी म्हंटले आहे.

तर, महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी बोलताना विनोद तावडे म्हणाले, मी देशभर फिरत असतो आणि ज्या पद्धतीचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री किंवा बाकी मंत्री मंडळी करत आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे. राजकारणाची एक वेगळी परंपरा आहे. मला आठवते मी विरोधी पक्ष नेता असताना सत्ताधारी लोकांवर टीका प्रचंड केली होती. पण त्यांच्यासोबत आम्ही एका केबिनमध्ये जेवलो होतो. तर महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा आहे. एकमेकांच्या पक्षाच्या नेत्यांच्या कार्यक्रमाला सर्व पक्ष उपस्थित रहाणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. सध्याचं असं पाहिलं की कुठेतरी वाईट वाटते, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप