ताज्या बातम्या

निवडणुकीच्या दिवशी मेट्रो प्रवाशांना तिकिटावर मिळणार १० टक्के सवलत

लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर महामुंबई मेट्रो प्रशासनानी मोठा निर्णय घेतला आहे.

Published by : shweta walge

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या सर्व प्रवाशांना २० मे, २०२४ रोजी प्रवासी तिकिटावर (मूळ तिकिट दरावर) १०% सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत मुंबई मेट्रो १ कार्ड, मोबाईल क्यूआर तिकीट, पेपर तिकीट अशा सर्व माध्यमातून देण्यात येणार आहे.

मुंबई मध्ये लोकसभा निवडणूक - २०२४ च्या पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे, २०२४ रोजी पार पडणार आहे. खर तर हा लोकशाहीचा उत्सव आहे. मतदार म्हणून मतदान करण्याकरीता या उत्सवात लोकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांचा जागरूकपणे सहभाग वाढावा यासाठी शासनामार्फत सर्व स्तरातून जनजागृती करण्यात येत आहे. सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नागरिकांना मेट्रोच्या माध्यमातून आरामदायक प्रवास करत, मतदानाचा आपला हक्क बजावता यावा यासाठी महामुंबई मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये मतदान करण्यासाठी मेट्रो प्रवाशांना प्रोत्साहित करून त्यांच्या मतदानाच्या कर्तुत्वाबाबत जाणीव करून देण्यासाठी, महामुंबई मेट्रो मतदार जागरूकता आणि सहभाग (SVEEP) या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहे. मुंबई मेट्रोने जास्तीत जास्त नागरिकांनी प्रवास करावा या दृष्टीने महामुंबई मेट्रो प्रयत्नशील आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करता येईल आणि त्यांना केंद्रापर्यंत आरामदायक प्रवास करता येणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; आजही विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक; बच्चू कडूंची आजपासून 7/12 कोरा यात्रा

Maharashtra Assembly Monsoon Session : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

Raigad : रायगडमध्ये समुद्रात संशयास्पद बोट आढळली; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर