prisoner  Team Lokshahi
ताज्या बातम्या

Mumbai : धक्कादायक! आर्थर रोड तुरुंगात कैद्यावर लैंगिक अत्याचार

कारागृहातील कैद्यांच्या अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

Published by : Team Lokshahi

मुंबई : राज्यातील आणि देशातील अनेक मोठमोठ्या गंभीर गुन्ह्यातील कैद्यांना आर्थर रोड (Arthur Road Jail) कारागृहात ठेवण्यात येते. आता याच कारागृहात एका कैद्यावरच लैंगिक अत्याचार (Sextual Harassment) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ना. म. जोशी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अत्याचार करणाऱ्या एका कैद्याला अटकदेखील करण्यात आली आहे.

मुंबईतल्या ओशिवरा आणि गोवंडी येथे राहणाऱ्या दोन कैद्यांना आर्थर रोड कारागृहात एकत्र ठेवण्यात आले होते. रविवारी १५ मे रोजी रात्री वीस वर्षाच्या एका कैद्यांवर एकोणीस वर्षांच्या कैद्याने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची तक्रार पीडित कैद्याने तुरुंग प्रशासनाला केल्यानंतर अत्याचार करणाऱ्या एकोणीस वर्षीय कैद्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर प्रकरणाची तक्रार ना. म. जोशी पोलीस ठाण्यात आर्थर रोड कारागृह प्रशासनाने दिल्यानंतर हे पोलिसांचे पथक कारागृहात पोहोचले. या प्रकरणी आरोपी कैद्यावर मारहाण करणे, अनैसर्गिक अत्याचार करणे आणि ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपी कैद्याला एका गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली होती. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याला आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आले होते. या प्रकरणामुळे आता पुन्हा एकदा कारागृहातील कैद्यांच्या अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा