पुण्यातील मुळशी येथील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर विविध घडामोडी घडू लागल्या आहेत. वैष्णवीचा जीव हुंड्यामुळे गेला असल्याने विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यातच वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या तिच्या पती, सासू आणि नणंदेला यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. तर तिचे सासरे राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे हे दोघे गेल्या 7 दिवसांपासून फरार होते. अखेर आज, शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दोघांनाही पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
पहाटे साडेचार वाजता बावधन पोलिसांकडून ही अटक करण्यात आली होती. हे दोघेही पुणे जिल्ह्यातून खेडेगावात लपले असल्याची माहिती समोर येत आहे. हगवणेच्या अटकेच्या आधीचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे. एका हॉटेलमधील सीसीटीव्ही असल्याची माहिती समोर येत आहे.