Admin
Admin
ताज्या बातम्या

जे दावे करतात आहे ते वेळेनुसार आमचा प्रचार करतील; बच्चू कडूंच्या दाव्यावर रवी राणांची प्रतिक्रिया

Published by : Siddhi Naringrekar

सूरज दहाट, अमरावती

अमरावतीत लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. दावे प्रति दावे केले जात आहेत. बच्चू कडूंनी देखील दावा केला आहे. अमरावती लोकसभा हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने थेट खासदार नवनीत राणा यांना बच्चू कडूंनी चॅलेंज केल आहे. प्रहारचा उमेदवार लोकसभेत राहणार असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिल्यानंतर यावर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दावे अनेक जण करतात. भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांचा निर्णय हा अंतिम असेल. राणा दाम्पत्य युती सोबत आहेत. दावे कितीही झाले, तरी सरकारचं अभिनंदन करेल. कारण दिव्यांग महामंडळ स्थापन करून खऱ्या अर्थाने आमच्या सहकाऱ्यांना त्यांनी न्याय दिला आहे. त्यामुळे सरकारचा अभिनंदनच आहे. जे दावे करतात आहे. ते सुद्धा आमचा प्रचार करतील. मोदीजींच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे. वेळेनुसार आपल्याला बदल दिसून येतील असे प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे

Labour Day Wishes: ज्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि समर्पणामुळे देश घडला अशा सर्व कामगारांना, कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Marathi Rajbhasha Day: मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देऊन जागवा मराठीचा अभिमान!

Maharashtra Day 2024 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

टी-२० वर्ल्डकपसाठी भारताच्या मुख्य संघात रिंकू सिंगला डावललं, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आवळला नाराजीचा सूर

"काँग्रेसला सत्तेत आणू नका, नाहीतर तुमच्या संपत्तीवर..." PM नरेंद्र मोदींचा जनतेला इशारा