ताज्या बातम्या

फडणवीस यांची दिल्लीत मक्का मदिना, मुख्यमंत्री का मुजरा करायला जातात? - संजय राऊत

Published by : Siddhi Naringrekar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतात आणि दिल्लीत जाऊन मुजरा करतात.आम्ही दिल्लीची गुलामी केली नाही. तुमची शिवसेना असली आहे तर झुकता कशाला?महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे म्हणता तर दिल्लीत जाण्याची गरज नाही. इथले निर्णय इथेच झाले पाहिजे. असे राऊत म्हणाले.

यासोबतच देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले समजू शकतो. त्यांची मक्का मदिना दिल्लीत आहे. तुमचं दिल्लीत काय आहे? तुम्ही दिल्लीत मुजरा का करता? स्वत:ला असली शिवसेना म्हणताना मग दिल्लीत कशाला जाता? असे म्हणत राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

Daily Horoscope 07 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 07 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

ICSE 2024 Results: आयसीएसई बोर्डाचा १०वी, १२वीचा निकाल जाहीर; यंदा मुलींनी मारली बाजी!

Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

Rice Water: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या...