ताज्या बातम्या

कामांचं उद्घाटन करून मोदी प्रचारांचं भूमिपूजन करत आहेत - संजय राऊत

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. अनेक विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. बीकेसीच्या मैदानावर भाजप मोठा कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावेळी वर्सोवा-घाटकोपर ही मेट्रो १ सेवा बंद ठेवली जाणार आहे. सायंकाळी ५.४५ ते ७.३० दरम्यान ही सेवा बंद ठेवली जाणार आहे.

याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेच्या कार्यकाळात महापालिकेने जी कामे केली आहेत, त्या कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. यातच शिवसेनेचं यश आहे. आम्हाला त्याचा आनंद आहे. शिवसेनेमुळे ज्या कामांना गती मिळाली त्या कामांचं उद्घाटन करून मोदी प्रचारांचं भूमिपूजन करत आहेत. असे राऊत म्हणाले.

यासोबतच “मोदींनी बेळगावसह सीमाभागात सुरू असलेल्या अत्याचारांबाबत तिथल्या मुख्यमंत्र्यांना सूचना देऊन त्याबाबत महाराष्ट्रात घोषणा करावी. ‘यापुढे बेळगावातील मराठी बांधवांवर अत्याचार करू नका अशा सूचना मी दिल्या आहेत’ असं मोदींनी जाहीर करावं. त्याचा आम्हाला आनंद होईल”. त्यामुळे कर्नाटक सीमाभागात अत्याचार सुरू आहेत. कर्नाटकातून येताना त्यासंदर्भात तेथील मुख्यमंत्र्यांना सूचना करून महाराष्ट्रात याबाबत घोषणा करावी, असं आवाहन संजय राऊतांनी मोदींना केलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा