ताज्या बातम्या

Krushna Andhale : फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? स्थानिकांनी बघितल्याचा दावा

बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.

यातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार असून त्याचा शोध सुरु आहे. यातच फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये बघितल्याचा दावा तिथल्या स्थानिकांनी केला आहे. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळेला बघितल्याचा काही लोकांनी दावा केला आहे.

या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांची टीम परिसरात येऊन सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहे. याच पद्धतीने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेण्याचं काम करत आहेत. तो मखमलाबादच्या दिशेने पुढे गेला असा देखील दावा नागरिकांनी केल्याने पोलिसांनी त्या दिशेने तीन पथके रवाना केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

Sanjay Raut : 'राज्याच्या सामाजिक, राजकीय वातावरणात नवे बदल घडणार'; संजय राऊतांचं विजयी मेळाव्याबाबत सूचक वक्तव्य

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला चंदनापुरी घाटात अपघात, विद्यार्थी जखमी