बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.
यातच आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 15 व्हिडीओ आणि 8 फोटो समोर आले आहेत. याच्याआधी देखील काही फोटो समोर आले होते.आरोपींनी संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडीओ बनवले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी महेश केदारने स्वतःच्या मोबाईल मध्ये देशमुख यांना मारहाण करताना तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो घेतले होते.
तब्बल दोन तास आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण करत असून व्हिडिओ देखील काढत होते. यामध्ये 3 वाजून 46 मिनिटांनी संतोश देशमुख यांना मारहाण करण्यात सुरुवात झाली तर शेवटचा व्हिडिओ हा 5 वाजून 53 मिनिटांचा आहे.