पाकिस्तान भारताजवळ थेट दोन हात करण्यासाठी घाबरते. त्यामुळे पाकिस्तान छुप्या मार्गाने भारतावर हल्ले करण्याच्या प्रयत्नात असतो. यासाठी वेगवेगळे प्रयत्न पाकिस्तानकडून करत असतात. तसाच हे प्रयत्न पाकिस्ताने केला आहे. तो म्हणजे पाकिस्तानी ड्रोनने भारतीय हद्दीमध्ये प्रवेश केला होता. जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) कठुआ (Kathua) जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये रविवारी पहाटे पाकिस्तानी ड्रोन घुसला. हा प्रकार सुरक्षा दलाच्या लक्षात आल्यावर जवानांनी गोळीबार करून या ड्रोनला (Drone) खाली पाडले. या ड्रोनला सात मॅग्नेटीक बॉम्ब आणि ग्रेनेड्स लावले होते.
कठुआ जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंग यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. ते म्हणाले की, 'कठुआ जिल्ह्यातील राजबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तल्ली हरिया चक परिसरात ड्रोनच्या हालचाली वाढत असल्याने दररोज सकाळी पोलिसांचे एक पथक पाठवले जायचे. जेव्हा या ड्रोनला सुरक्षा दलांनी पाहिले आणि त्यावर त्वारित ड्रोनच्या दिशेने गोळीबार करत त्या पाकिस्तानी ड्रोनला खाली पाडण्यामध्ये सुरक्षा दलाला यश मिळाले आहे.'
या ड्रोनला सात चुंबकीय (मॅग्नेटीक ) बॉब्म आणि सात यूबीजीएल (UBGL) ग्रेनेड होते ते जप्त करण्यात आले आहे. हे बॉम्ब घटनास्थळी निकामी केले आहेत. हरिया चक हा परिसर तर पाकिस्तानी दहशतवाद्यांसाठी घुसखोरीचा पसंतीचा मार्ग बनला आहे.
अमरनाथ यात्रेला 30 जूनपासून सुरूवात होणार असल्याने सुरक्षा दलाने मार्गक्रमावर सुरक्षा वाढवली आहे. नुकत्याचं घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षा दल सतर्क झाले आहे.