sharad pawar Tea Lokshahi
ताज्या बातम्या

'न टायर्ड हूं, न रिटायर्ड...मे तो फायर हूं' अटलजींच्या शब्दात शरद पवारांचा दृढ विश्वास

शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत बंड झालं, त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत.

Published by : shweta walge

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे. त्यातच दुसरीकडे राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यात एकच राजकीय खळबळ माजली आहे. या बंडखोरीनंतर शरद पवार यांनी कंबर कसली आहे. तर आज शरद पवार यांनी पहिली सभा छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ले घेत पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांना पत्रकारांनी अजित पवार तुम्हाला रिटायर्ड व्हायला सांगत आहेत त्यावर काय सांगाल? असं विचारलं असता शरद पवार यांनी ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ या अटलबिहारी वाजपेयींच्या ओळी उच्चारत शरद पवार यांनी अजित पवारांना टोला लगावलत उत्तर दिलं आहे.

शरद पवार म्हणाले की, वय होतं यात काही वाद नाही. पण तुम्ही प्रकृती चांगली ठेवली तर वय साथ देतं. त्यामुळे तो काही प्रश्न नाही. मोरारजी देसाई हे पंतप्रधान होते तेव्हा त्यांचं वय ८४ होतं. ते ज्या जोमाने काम करायचे तो अनुभव थक्क करणारा होता असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

मी आज रस्त्याने येत असताना लोकांचे चेहरे, त्यांचे हावभाव मी पाहिले. सामान्य लोकांच्या चेहऱ्यांमधून जो आत्मविश्वास होता त्यामुळे मला आनंद आहे. छगन भुजबळ यांचा मुंबईत पराभव झाल्यानंतर आमची इच्छा होती की त्यांनी विधानसभेत आवश्यकता आहे. त्यानंतर येवल्यातून त्यांनी निवडणूक लढवली. १९८६ मध्ये मी काँग्रेसमधून बाहेर पडलो वेगळा पक्ष निवडला होता तेव्हा नाशिक जिल्ह्याने आम्हाला विजयी केलं होतं. जनार्दन पाटील हे येवल्यातून दोनदा निवडून आले होते. मारोतराव पवारही निवडूनही आले होते. त्यामुळेच आम्ही भुजबळांना सेफ जागा दिली होती. त्यावेळी तशी चर्चा झाली आणि तो निर्णय घेतला होता असंही आज शरद पवार यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, माझी भूमिका मांडण्याची सुरुवात करण्यासाठी आज मी बाहेर पडलो आहे असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. मी इथे येत असताना आम्हाला सगळ्यांना म्हणजे मी, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे, सुप्रिया आम्हा सगळ्यांचं लोकांनी स्वागत केलं. आनंद एका गोष्टीचा आहे की वरुणराजाने स्वागत केलं. नाशिक जिल्ह्यात मी आत्ताच विचारत होतो की पावसाची स्थिती काय आहे? मला हे सांगण्यात आलं की रिमझिम आहे. पण पुरेसा पाऊस झालेला नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

मी नाशिक निवडलं? कारण स्वातंत्र्याच्या इतिहासात नाशिकचं वेगळं महत्व आहे. तसंच काँग्रेसच्या इतिहासातही नाशिकचं वेगळं महत्त्व आहे. अनेक उत्तम मार्गदर्शक या शहराने दिले आहेत. तसंच आणखी एक गोष्ट अशी आहे की आम्ही सगळे जण जी पिढी राजकारणात पडली त्यांचा आदर्श यशवंतराव चव्हाण होते. त्यावेळी चीनचं संकट देशावर आलं आणि त्यांना नेहरुंनी दिल्लीत बोलवलं. त्यांना संरक्षण मंत्री केलं. चव्हाण यांचा पहिला लोकसभेतला प्रवेश नाशिकमधून झाला. ही नाशिकची पार्श्वभूमी आहे त्यामुळे मी इथून सुरुवात केली आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा