ताज्या बातम्या

दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही - संजय राऊत

Published by : Siddhi Naringrekar

बेळगाव सीमाभागातील हिरेबागवाडी टोलनाक्यावर काल (6 डिसेंबर) महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या सहा ट्रकची तोडफोड कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर राज्यात संतापाची लाट आहे. या प्रकारानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना फोन करुन निषेध व्यक्त केला. यावर बसवराज बोम्माई यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचं तसंच महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं.

या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र इतका लेचा-पेचा कधीच झाला नव्हता. यांनी तीन महिन्यात महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकले आहे. दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही, असा गंभीर आरोप संजय राऊत यांना केला आहे.

“मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, तीन महिन्यांपूर्वी आम्ही क्रांती केली. आता क्रांती दिसत आहे. स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली, असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. हा षंढपणा आहे” या सरकारला चिन्ह म्हणून कुलूप दिले पाहिजे असे राऊत म्हणाले. यासोबतच संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जनतेची काळजी नाही. शिंदेंनी राजीनामा द्यावा. शिंदे स्वत:ला भाई समजतात आता त्यांनी कर्नाटकात भाईगिरी दाखवावी. महाराष्ट्राला कमजोर करण्याचे धोरण यांनी केलं आहे. शरद पवारांच्या नेतृत्वात आम्ही कर्नाटकात जायला तयार आहे. हे सरकार दिल्लीला टेंडर भरुन आलं आहे. असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या सूचना

सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Lottery: मनमाडमधील ग्राहकाने जिंकली ७ लाख रुपयांची लॉटरी

Varsha Gaikwad : जनता जाणतेय यावेळेला महाविकास आघाडीला निवडून द्यायचं आहे

प्रसिद्ध गायक नंदेश उमप निवडणुकीच्या रिंगणात