ताज्या बातम्या

परभणीतील बंदला हिंसक वळण, सुप्रिया सुळेंकडून निषेध व्यक्त म्हणाल्या...

परभणी जिल्हा बंद आंदोलनाला हिंसक वळण, सुप्रिया सुळे यांनी कठोर कारवाईची मागणी केली. आंबेडकरी अनुयायांनी संविधानाचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत नंदिग्राम एक्सप्रेस रोखली.

Published by : shweta walge

आंबेडकरी अनुयायांनी पुकारलेल्या परभणी जिल्हा बंद आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आता प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाकडून जमाव बंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. शांततेत बंद सुरू असताना अचानकपणे जमाव आक्रमक झाला. परभणी शहरात दगडफेक, रस्त्यांवर जाळपोळीचे प्रकार घडले. आंदोलकांवर नियंत्रणासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. तर, काही ठिकाणी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. यावरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे यांच ट्विट

परभणी शहरात एका समाजकंटकाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याचा प्रकार संतापजनक आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. संविधानाचा अवमान करणाऱ्यांना त्यातील समतेची तत्वे अमान्य आहेत असेच म्हणावे लागेल. या घृणास्पद कृत्याचा निषेध.

रभणीत काय घडलं?

परभणीत एका माथेफिरूने संविधान पुस्तकाचा अपमान केल्याने आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरले आणि तीव्र विरोध प्रदर्शन सुरू केले. शेकडो आंबेडकरी अनुयायी रेल्वे रुळावर जमा झाले आणि त्यानंतर आंदोलकांनी नंदिग्राम एक्सप्रेस रोखली. या आंदोलनाद्वारे ते संविधानाचा अपमान करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी करत होते. माथेफिरूवर कारवाई होईपर्यंत आंदोलकांनी रेल्वे स्थानकात ठिय्या दिला, ज्यामुळे स्थानकावर तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ravindra Chavan On Thackeray Bandhu : 'म' मतांचाच हे राज्याला कळलंय'; ठाकरेंच्या युतीवर चव्हाणांचे विधान

Chhatrapati Sambhajinagar : भयंकर ! मुलाचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह पाहून आईचा आक्रोश

Ajit Pawar : 'चीनहून होणारी निकृष्ट बेदाण्यांची आयात थांबवा'; उपमुख्यमंत्री अजित पवारांची केंद्राकडे पत्राद्वारे मागणी

Shashikant Shinde : "रणनीतीवर वेगळ्या पद्धतीने...", जयंत पाटलांच्या राजीनाम्यानंतर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया