Uddhav Thackeray and Devendra Fadnavis  Team Lokshahi
ताज्या बातम्या

Uddhav Thackeray Aurangabad Sabha : जल आक्रोश मोर्चा संभाजीनगरच्या पाण्यासाठी नव्हता, तर...; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

पाच वर्षांपूर्वी तेच सत्तेत होते, त्यांनी पाण्यासाठी काय केलं याचा हिशोब द्यावा असंही आव्हान त्यांनी भाजपला दिलं.

Published by : Shweta Chavan-Zagade

औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच दरम्यान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद शहरात भव्य ‘जल आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. याचपार्श्वभूमीवर औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) टीका केली आहे.

दरम्यान विरोधकांनी जल आक्रोश मोर्चा काढला होता, तो आक्रोश संभाजीनगरच्या पाण्यासाठी नव्हता तर सत्ता गेल्याचा आक्रोश होता असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. पाच वर्षांपूर्वी तेच सत्तेत होते, त्यांनी पाण्यासाठी काय केलं याचा हिशोब द्यावा असंही आव्हान त्यांनी भाजपला दिलं.

मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादमध्ये 8 जून 1985 रोजी स्थापन करण्यात आली होती. या शाखेच्या 37 व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

गेल्या काही दिवसांमध्ये औरंगाबादमधील पाणी प्रश्न (Water issue in Aurangabad) बिकट झाला होता. या आधी पाच- दहा दिवसांनंतर पाणी यायचं, ते आता कमी झालं आहे. संभाजीनगरसाठीच्या नवी योजना मी पूर्ण करणार, त्यासाठी प्रशासनाला आदेश दिले आहेत. इथल्या योजनेला एक पैसाही कमी पडू देणार नाही. कंत्राटदार जर यामध्ये वेळकाढूपणा करत असेल तर त्याला तुरुंगात टाका असा आदेश दिला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा