Vat Purnima Quotes in Marathi: सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. वटसावित्री दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सौभाग्यलंकार परिधान करून वडाचे पूजन केले जाते.
"कुंकवाचा साज असाच कायम राहू द्या,
नवऱ्याला दीर्घायुष्य लाभू द्या,
हीच करूनी प्रार्थना, करते मनोभावे पूजा
असाच जोडीदार मिळावा हीच सदिच्छा
वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा"
"सण सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचा
या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा"
"वडाच्या झाडाइतकं दीर्घायुष्य मिळो तुला,
जन्मोजन्मी तुझा सहवास लाभो मला
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा"
"मराठी संस्कृतीची प्रतिमा
सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण
बांधूनी नात्याचे बंधन
करेन साता जन्माचे समर्पण
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा"