पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आज शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काँग्रेसचे कसबा पेठचे माजी आमदार रविंद्र धंगेकर आज पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळत असून या पत्रकार परिषदेमधून ते नवी राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून रवींद्र धंगकेर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यासोबतच काही दिवसांपुर्वी धंगेकर यांनी ठेवलेल्या स्टेटसमुळेही खूप चर्चा सुरु रंगली. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यामुळे आज रवींद्र धंगेकर कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.