मुंबई - नवी मुंबई प्रवास अटल सेतूवरून करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अटल सेतू पुलावरून मुंबई ते नवी मुंबई मार्गावरील भाड्यात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. ज्यामुळे प्रवास अधिक स्वस्त झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन (NMMT) ने भाड्यात कपात केली आहे, ज्यामुळे या मार्गावरील प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
किती रूपयांची कपात करण्यात आली?
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, खारघर-मंत्रालय मार्गाचे भाडे रु. 270 वरून 120 रु.वर कमी झाले आहे. तर नेरूळ-मंत्रालयाचे भाडे रु. 230 वरून 105 रु.वर घसरले आहे. NMMT च्या अधिकाऱ्याने सांगितले की, "भाड्यात कपात झाली आहे. 116 मार्गासाठी प्रवाशांची सरासरी संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याने त्याचा तात्काळ परिणाम झाला. सुमारे 20 ते 60, आणि मार्ग 117 साठी, संख्या 20-25 वरून 70 पर्यंत वाढली आहे,"
एनएमएमटीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नवी मुंबई आणि मंत्रालयाला जोडणारे हे दोन मार्ग चालवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मात्र अधिक भाड्यामुळे प्रवासी निराश होते. परिवहन प्राधिकरणाने अधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी हे दर कमी करण्यात आले आहेत.
अटल सेतू वर्षपूर्तीच्या उंबरठ्यावर
गेल्या वर्षी 12 जानेवारी रोजी शिवडी - न्हावा शेवा अटल सेतूचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं होतं. त्यानंतर अटल सेतू सर्वांसाठी खुला करण्यात आला. या ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर केवळ 20 मिनिटांत पार करणं शक्य झालं आहे. हा देशातील सर्वात लांब समुद्री पूल आहे. अटल सेतू हा 22 किमी लांबीचा आहे.