ताज्या बातम्या

नागपुरात काँग्रेस आक्रमक, पोलिसांनी नाना पटोलेंना नेलं उचलून

Published by : shweta walge

सध्या नागपुरात विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यातच नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक होताना पहायला मिळाली. राज्यात लाखो सरकारी पदे रिक्त आहेत. या पदांसाठी सरकारने जाहिरात देऊन तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करत युवक काँग्रेस नागपुरात रस्त्यावर उतरली. युवक काँग्रेसचा शुक्रवारी विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, युवकचे प्रदेशाध्यक्ष कुमार राऊत यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन सर्व आंदोलक तरुण आक्रमक झाले.

हे सरकार तरुणांचा आवाज दाबायला लागले हे. तरुणाईला बरबाद करण्याचे काम हे सरकार करत आहे. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते त्यावेळेसही महाभरतीच्या नावाने ऑनलाईन पद्धतीने तरुणांना लुटण्यात आले. नोकऱ्या दिल्या नाहीत, असे पटोले म्हणाले.

“आम्ही सगळे जेलभरु. पण या सरकारशी दोन हात केल्याशिवाय युवक काँग्रेस शांत बसणार नाही. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. हे सरकार तरुणांचं आयुष्य खराब करायला निघालं. पोलीस दलातही मोठी पदं खाली आहेत. सर्व विभागात पदं खाली असताना ऑनलाईनच्या नावाने तरुणांना लुटलं जात आहे. हे चीटफंडवालं सरकार आहे. या सरकारने पिढी बदनाम करण्याचं काम केलं. त्यामुळे तरुणांचा उद्रेक होणं साहजिक आहे”, अशी भूमिका नाना पटोल यांनी मांडली.

“महाराष्ट्रात 25 लाख पदं खाली पडली आहे. सरकार ही पदं भरायला तयार नाही. त्यामुळे तरुणांचा हा उद्रेक बघायला मिळतोय. शिकलेल्या तरुणांना न्याय देण्यासाठी आम्ही बॅरिकेट्स काय सरकारच्या भिंती तोडून त्यांच्या छातडावर बसून आम्ही न्याय मिळवून देऊ”, असं नाना पटोले म्हणाले.

"राहुल गांधी तुम्ही पाकिस्तानला घाबरा पण आम्ही भाजपवाले आहोत", पालघरमध्ये अमित शहांचा इंडिया आघाडीवर घणाघात

"येत्या काळात धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरु होतील"; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

Amol Kolhe: खासदार अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात, कोल्हे यांची लोकशाहीला प्रतिक्रिया

Punit Balan: पुनीत बालन यांनी सपत्नीक केलं मतदान, नागरिकांनाही केलं मतदान करण्याचे आवाहन

"राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उद्धव ठाकरे, राहुल गांधी उपस्थित राहिले नाहीत, कारण...", अमित शहांनी स्पष्टच सांगितलं