Admin
लोकशाही स्पेशल

Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला शंकराला बेलपत्र का अर्पण केले जाते?

माघ कृष्ण पक्ष चतुर्दशीला महादेव आणि पार्वतीचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे.

Published by : Siddhi Naringrekar

माघ कृष्ण पक्ष चतुर्दशीला महादेव आणि पार्वतीचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे. महाशिवरात्री हा सण भगवान महादेव आणि पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. सगळीकडे मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी केली जाते. भाविक शंकराच्या मंदीरात दर्शन घेण्यासाठी जातात.

महाशिवरात्रीच्या सणाचे महत्त्व आहे कारण ही शिव आणि शक्तीच्या मिलनाची रात्र आहे. या दिवशी सर्व शिवमंदिरांमध्ये भोलेनाथाचा रुद्राभिषेक चालतो आणि भक्तही या दिवशी उपवास करतात.समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय. तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीच विवाह झाला होता. बेलपत्र हा महादेवाची सर्वात आवडती गोष्ट मानली जाते. असे म्हणतात की, देवी पार्वतीने स्वतः भगवान शंकराची बेलाच्या पानांनी पूजा केली होती, म्हणूनच बेलाची पाने शिवाला खूप प्रिय आहेत.

माता पार्वतीने शंकराला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, कठोर तपश्चर्या केली. त्यांनी अनेक प्रकारचे उपवास केले. एकदा महादेव जंगलात बेलाच्या झाडाखाली बसून तपश्चर्या करत असताना देवी पार्वती शिवाची पूजा करण्यासाठी पूजेचे साहित्य आणायला विसरल्या. मग त्यांनी झाडाच्या गळून पडलेल्या पानांनीच शिवाची आराधना सुरू केली आणि देवाला पानांनी पूर्णपणे झाकून टाकले. यावर भगवान शिव खूप प्रसन्न झाले आणि तेव्हापासून त्यांना बेलाची पाने वाहिली जातात

वरील सर्व बाबी लोकशाही मराठी न्यूज केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लोकशाही मराठी न्यूज कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जरांगेंच्या आंदोलनाला 1 दिवस मुदत वाढ

Eknath Shinde On Manoj Jarange : "...आरक्षण मराठा समाजाला देणार नाही"! मुंबईत मनोज जरांगेंचं आंदोलन पुन्हा पेटलं, एकनाथ शिंदे म्हणाले...

B Sudarshan Reddy Meets Thackeray : INDIA आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी ठाकरेंच्या भेटीला; उपराष्ट्रपतीपदावरुन गुप्त चर्चा

Manoj Jarange Mumbai Morcha : "हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही..." ; आझाद मैदानावर मनोज जरांगेंची गर्जना