लोकशाही स्पेशल

दिनविशेष 15 ऑगस्ट 2023 : भारतीय स्वातंत्र्य दिन; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 15 August 2023 : सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 15 ऑगस्ट या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

भारतीय स्वातंत्र्य दिन

संस्कृत दिन

२०२२: अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (All India Football Federation) - FIFA ने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पूर्णपणे निलंबित केले.

१९८८: मिले सूर मेरा तुम्हारा दूरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित झाले.

१९८२: भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली.

१९४८: दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली.

१९४७: पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले.

१९२९: ग्राफ झेपेलिन हा संशोधक बलून मधून जगप्रवासासाठी रवाना झाले.

१८६२: मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना झाली.

१६६४: कुडाळ प्रांतात शिवाजी महाराजांनी खवासखानाला (दुसऱ्यांदा) पराभूत केले.

आज यांचा जन्म

१९९२: भास्करन आडहान - भारतीय बुद्धिबळपटू

१९७५: विजय भारद्वाज - भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक

१९७१: अदनान सामी - भारतीय गायक आणि संगीतकार - पद्मश्री

१९७०: राज कौशल - भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते (निधन: ३० जून २०२१)

१९६४: श्रीहरी - भारतीय अभिनेते (निधन: ९ ऑक्टोबर २०१३)

१९६१: सुहासिनी मणिरत्नम - भारतीय अभिनेत्री आणि पटकथालेखक

१९५८: सिंपल कपाडिया - अभिनेत्री आणि वेशभूषाकार (निधन: १० नोव्हेंबर २००९)

१९४९: सिद्धरामय्या - कर्नाटकचे २२वे मुख्यमंत्री

१९४७: राखी गुलझार - चित्रपट अभिनेत्री

१९३०: स्वामी दयानंद सरस्वती - भारतीय भिक्षू आणि तत्त्वज्ञ (निधन: २३ सप्टेंबर २०१५)

१९२९: उमाकांत ठोमरे - साहित्यिक आणि वीणा मासिकाचे संपादक (निधन: ७ ऑक्टोबर १९९९)

१९२६: सुकांता भट्टाचार्य - भारतीय कवी आणि नाटककार (निधन: १३ मे १९७४)

१९२२: वामनदादा कर्डक - लोककवी

१९२२: कुशाभाऊ ठाकरे - वकील आणि राजकारणी (निधन: २८ डिसेंबर २००३)

१९१७: सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी - भारतीय ज्येष्ठ लेखिका (निधन: १३ नोव्हेंबर २००१)

१९१३: बी. रघुनाथ - लेखक, कवी (निधन: ७ सप्टेंबर १९५३)

१९१३: भगवान रघुनाथ कुळकर्णी - मराठी कवी आणि लेखक (निधन: ७ सप्टेंबर १९५३)

१९१२: उस्ताद अमीर खान - इंदौर घराण्याचे संस्थापक - पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (निधन: १३ फेब्रुवारी १९७४)

आज यांची पुण्यतिथी

२००५: बॅंडापुडी वेंकट सत्यनारायण - भारतीय त्वचाशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक (जन्म: ३० जानेवारी १९२७)

२००४: अमरसिंग चौधरी - गुजरातचे ८वे मुख्यमंत्री (जन्म: ३१ जुलै १९४१)

१९७४: स्वामी स्वरुपानंद - (जन्म: १५ डिसेंबर १९०३)

१९४२: महादेव देसाई - स्वातंत्र्य लढ्यातील नेते (जन्म: १ जानेवारी १८९२)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ओबीसी मंडल यात्रेसाठी शरद पवार नागपूर दौऱ्यावर…

Raksha Bandhan Trafic Jam : रक्षाबंधनाचा आनंद वाहतूक कोंडीत अडकला; लाडकी बहिण-भावाचा सण सिग्नलवर थांबला

Nashik : रक्षाबंधन ठरलं अखेरचं! बिबट्याने केली भावाबहीणीच्या नात्याची ताटातूट

Raksha Bandhan : वलसाडमधील अनोखं रक्षाबंधन; बहीण सोडून गेली, पण तिच्या हाताने बांधली राखी