Tata Ipl 2022 Team Lokshahi
क्रीडा

आयपीएल 2022 च्या रेसमध्ये हे चार चॅम्पियन्स सगळयांना धोबीपछाड देत आले समोर

सर्व संघांना मागे टाकत चार संघ समोर आले आहेत.

Published by : shamal ghanekar

यावेळी 'इंडियन प्रीमियर लीग' (Indian Premier League) अर्थात आयपीएल 2022 (Ipl 2022) दिग्गजसंघांचा घाम काढणारी सिद्ध झाली. तेच दुसऱ्या काही संघांसाठी आयपीएल एकदम चमकदार विजय मिळवून देणारी संधी सिद्ध झाली आहे. सर्वात जास्त म्हणजे 5 वेळा आयपीएलचा खिताब जिंकलेल्या टी 20 लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ होता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians). यावेळी 50 सामन्यांनंतरही या संघाला सूर सापडला नाही. हा संघ प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर फेकला जाणारा पहिला संघ बनला.

डिफेंडिंग चॅम्पयन आणि 4 वेळा विजेता झालेला चेन्नई सुपरकिंग्सही (Chennai Super Kings) जवळपास आता बाहेर पडली आहे. तेच, दोनदा आयपीएलचा खिताब जिंकलेली केकेआरही (Kolkata Knight Riders) आता खराब स्थितीत आहे.

बाकी सर्व संघांना मागे टाकत चार संघ समोर आले आहेत. यात राजस्थान रॉयल्स, सनराइझर्स हैदराबाद, लखनऊ सुपरजायंट्स आणि गुजरात टाइटंसचा समावेश आहे. यांच्या विकेट्सबाबत बोलायचं तर, राजस्थान रॉयल्सने आजवर 69, सनराइझर्स हैदराबादने 62, लखनऊ सुपरजायंट्स ने 61 आणि गुजरात टायटन्सने 60 विकेट्स आपापल्या खात्यात टाकले आहेत.

स्वदेशी मायक्रो-ब्लॉगिंग मंच, 'कू'वर काही दिवसांपासून याच चार संघांची जादू चालते आहे. भारतीय क्रिकेटर्स आणि त्यांचे चाहते लोक या चारही संघांचं भरभरून कौतुक करत आहेत.

भारतीय क्रिकेटर अभिनव चारही टीम्सचे कौतुक करताना म्हणतात:

तुफान प्रभावी गोलंदाजी करणारे संघच या हंगामात श्रेष्ठ बनून समोर आले आहेत. पॉवरप्ले आणि दरम्यानच्या ओव्हर्समध्ये विकेट घेणे केवळ गोलंदाजी करण्याहून जास्त महत्त्वाचे आहे. स्टँडिंगमध्ये टॉप चार संघांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. यातून कळते, की #MI सारख्या सुपर टीम्स सध्या का संघर्ष करत आहेत.

तर, भारतीय महिला क्रिकेटर हरलीन कौर देओल (Harleen Kaur Deol) यांनी विजयाचे श्रेय कर्णधाराला दिले. त्या म्हणतात:

एका कर्णधाराला आपल्या टीम इतकेच विजयाचे श्रेय जाते. कर्णधार एक अशी कुशल व्यक्ती असते, जी एकाच संघात गोलंदाज आणि फलंदाज यांचा योग्य समन्वय करते. ज्या कर्णधाराला हे चांगले जमते, त्याच्याच संघाने आयपएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

#IPL2022 #CricketOnKoo

भारतीय महिला क्रिकेटर निकिता भुवा यांनी गोलंदाजांचे कौतुक करताना म्हटले:

#IPL_2022 वर आतापर्यंत गोलंदाजांनी आपला ठसा उमटवला.

या हंगामाच्या आईपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा संघ अव्वल स्थानावर आहे.

यातून आयपीएलमध्ये खेळाचा दर्जाही सुधारला आहे.

#CricketOnKoo #IPL2022

क्रिकेटचे एक फॅन जोहन्स बॅनी कू करताना म्हणतात,

आयपीएल 2022 मध्ये सर्वात जास्त बळी घेणारा आणि सर्वाधिक धावा करणारा खेळाडू एकाच संघातला आहे.

#IPL2022 #CricketOnKoo

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा