Mithali Raj Retirement
Mithali Raj Retirement team lokshahi
क्रीडा

Mithali Raj Retirement : लेडी सचिनने क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

Published by : Shubham Tate

Mithali Raj Retirement : भारतीय महिला क्रिकेटची दिग्गज मिताली राजने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. बुधवारी अचानक त्यांनी सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून निवृत्ती जाहीर केली. 39 वर्षीय क्रिकेटपटूने कसोटी, एकदिवसीय, टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. पण लेडी सचिन तेंडुलकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिताली राजचे (Mithali Raj) विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. (mithali raj has announced her retirement from all forms of international cricket)

सोशल मीडियावर भावनिक संदेश शेअर

निवृत्तीची घोषणा करताना, मिताली राजने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक भावनिक पत्र शेअर केले आणि लिहिले - "मी लहान मुलीच्या रूपात निळ्या जर्सी घालून भारताच्या प्रवासाला निघाले, कारण देशाचे प्रतिनिधित्व करणे हा सर्वोच्च सन्मान आहे. हा प्रवास खूप चढ-उतारांनी भरलेला होता. प्रत्येक घटनेने मला काहीतरी वेगळे शिकवले आणि गेली 23 वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वात परिपूर्ण, आव्हानात्मक आणि आनंददायक आहेत. सर्व प्रवासांप्रमाणेच या प्रवासाचाही शेवट झाला पाहिजे. आज तो दिवस आहे, मी निवृत्त होत आहे.

बीसीसीआयचे आभार

मितालीने तिच्या पोस्टमध्ये बीसीसीआयसह इतर लोकांचे आभार मानले आहेत. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एकीकडे निवृत्तीची बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे, तर दुसरीकडे अनेक जण या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

अशी क्रिकेट कारकीर्द होती

मिताली राजच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, तिने 1999 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी पदार्पण केले आणि दीर्घकाळ भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्वही केले. तिच्या नेतृत्वाखाली भारताने 2000, 2005, 2009, 2013 आणि 2017 मध्ये महिला विश्वचषकही खेळला. मात्र, आतापर्यंत संघाला एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही. भारतासाठी 12 कसोटी सामन्यांमध्ये 699 धावा, 232 एकदिवसीय सामन्यांमध्ये 7805 आणि 89 टी-20 सामन्यांमध्ये 2364 धावा केल्या आहेत.

दिनविशेष ३ मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"ज्यांनी गुन्हा केला नाही, त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम मोदी सरकारनं केलं", सांगलीच्या सभेत शरद पवारांचा हल्लाबोल

Priyanka Chaturvedi: चित्रा वाघ यांच्या जाहिरातीवरील वक्तव्यावर प्रियांका चतुर्वेदींचे प्रत्युत्तर

Sushma Andhare: शिवसेना UBTच्या जाहिरातवरून चित्रा वाघांचा हल्लाबोल, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

"...आता देश चालवण्यात महिलांचीही भागिदारी असणार", उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान