llct20 | Sourav Ganguly team lokshahi
क्रीडा

Sourav Ganguly : सौरव गांगुली 7 वर्षांनंतर उतरणार मैदानात, फिटनेससाठी केली जिम जाॅईन

गांगुली लवकरच खेळताना दिसणार

Published by : Team Lokshahi

Sourav Ganguly : आपल्या कर्णधारपदाखाली भारतीय संघाला उंचीवर नेणारा आणि परदेशी भूमीवर विजय मिळवण्याची संधी असलेला कर्णधार सौरव गांगुली पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची तयारी करत आहे. या वर्षी होणाऱ्या लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत तो प्रवेश करणार आहे. गांगुली 7 वर्षांनंतर क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. (sourav ganguly play in legends league cricket llct20)

खुद्द माजी कर्णधार गांगुलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. गांगुलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. गांगुलीने त्याच्या पोस्टद्वारे सांगितले आहे की तो एक चॅरिटी सामना असेल, ज्यामध्ये तो खेळताना दिसणार आहे.

गांगुली लवकरच खेळताना दिसणार

भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थही हा सामना खेळवला जात आहे. या इंस्टाग्राम पोस्टमध्ये फोटो शेअर करत गांगुलीने लिहिले की, 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या स्मरणार्थ आयोजित चॅरिटी मॅचची तयारी सुरू आहे. मी त्याची तयारी आणि प्रशिक्षणाचा आनंद घेत आहे.

सौरव गांगुलीने त्याच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, 'भारताच्या 75 वर्षांच्या स्वातंत्र्यासाठी आणि महिला सशक्तीकरणासाठी लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये लवकरच खेळणार आहे.'

गेल्या सामन्यात गांगुलीने अर्धशतक केले होते

सौरव गांगुली सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष आहेत. 7 वर्षांनंतर मैदानात उतरताना दिसणार आहे. गांगुलीने नोव्हेंबर 2015 मध्ये क्रिकेट ऑल-स्टार्स मालिकेत शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर गांगुलीने लॉस एंजेलिसमध्ये सचिनच्या ब्लास्टर्स संघासाठी एक सामना खेळला, ज्यामध्ये त्याने 37 चेंडूत 50 धावा केल्या. सौरव गांगुलीने टीम इंडियासाठी 113 कसोटीत 7212 धावा आणि 311 एकदिवसीय सामन्यांमध्ये 11363 धावा केल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा