क्रीडा

IND vs SA, 2nd ODI: दक्षिण आफ्रिकेचा 2-0 ने मालिकेवर कब्जा

Published by : Lokshahi News

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (IND vs SA) भारताचा सात विकेट राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताने विजयासाठी दिलेले 288 धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने अगदी आरामात पार केले.

सलामीवीर क्विंटन डि कॉक (78) आणि जानेमन मालान (91) यांनी पहिल्या विकेटसाठी 132 धावांची भागीदारी करुन विजयाची पायाभरणी केली. शार्दुल ठाकूरने डिकॉकला पायचीत करुन ही जोडी फोडली. भारताला दुसरा विकेट 212 धावांवर मिळाला. पण तो पर्यंत खूप उशीर झाला होता. मार्कराम आणि डुसेने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

भारताकडून सलामीला आलेल्या शिखर धवन आणि राहुल जोडीने चांगली सुरुवात करुन दिली. 63 धावांवर धवनच्या रुपाने भारताला पहिला झटका बसला. त्यानतंर विराट कोहली भोपळाही न फोडता माघारी परतला. पुन्हा एकदा भारताचा डाव गडगडतो की, काय असे वाटत असतानाच ऋषभ पंतने (85) जबाबदारीने खेळ केला. लोकेश राहुल (55) सोबत त्याने शतकी भागीदारी रचली.शार्दुल ठाकूरने आज पुन्हा एकदा संघासाठी 38 चेंडूत नाबाद 40 धावांची महत्त्वाची खेळी करुन महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने आणि अश्विनने सातव्या विकेटसाठी केलेली नाबाद 48 धावांची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली. अश्विनने 24 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या. अश्विन आणि शार्दुलच्या भागीदारीमुळे भारताला 50 षटकात 287 धावांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचता आले.

घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, दोषींवर कारवाई करण्यासाठी CM शिंदेंनी दिल्या सूचना

T20 वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा घेणार निवृत्ती? हार्दिक पंड्याच्या निवडीबाबत मोठी अपडेट आली समोर

दिनविशेष 14 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मुंबई, ठाणे, रायगडला अवकाळी पावसानं झोडपलं! वादळी वाऱ्यामुळं घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं, ४ जणांचा मृत्यू

"राहुल गांधी तुम्ही पाकिस्तानला घाबरा पण आम्ही भाजपवाले आहोत", पालघरमध्ये अमित शहांचा इंडिया आघाडीवर घणाघात