India Vs West Indies | Shikhar Dhawan team lokshahi
क्रीडा

India Vs West Indies : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवन करणार नेतृत्व

या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती

Published by : Shubham Tate

Shikhar Dhawan : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी शिखर धवनला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे, तर रवींद्र जडेजा उपकर्णधार बनला आहे. इंग्लंडमध्ये होणार्‍या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर भारताला वेस्ट इंडिजचा दौरा करायचा आहे, तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. (team india for west indies tour odi series india vs west indies shikhar dhawan captain ravindra jadeja)

बीसीसीआयने बुधवारी टीम इंडियाची घोषणा केली. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया:

शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (डब्ल्यूके), संजू सॅमसन (डब्ल्यूके), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Raut : मुंबईत आज साजरा होणार ‘मराठी विजय दिन’; संजय राऊतांनी सांगितली कार्यक्रमाची रुपरेषा

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून