Virat Kohli | monty panesar  team lokshahi
क्रीडा

'बीसीसीआय विराट कोहलीला वगळू शकत नाही...', कारण आलं समोर

आता बीसीसीआयलाही विचार करावा लागणार

Published by : Shubham Tate

Virat Kohli Team India : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा सध्याचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. विराट कोहलीने बरेच दिवस शतक झळकावलेले नाही, तर आता मोठ्या धावसंख्येची प्रतीक्षाही वाढत आहे. अशा परिस्थितीत विराट कोहलीला प्लेइंग-11 मधून वगळावे, अशी मागणी होत आहे. (virat kohli team india playing 11 monty panesar statement t20 world cup bcci money)

पण आता या संपूर्ण वादावर इंग्लंडचा माजी क्रिकेटर मॉन्टी पानेसरने आपलं मत मांडलं आहे. मॉन्टी पानेसर म्हणतात की बीसीसीआय विराट कोहलीला वगळू शकत नाही, कारण त्यामुळे कमाईत मोठा फरक पडेल.

मॉन्टी पानेसरने एका मुलाखतीत विराट कोहलीबद्दल सांगितले की तो जगातील सर्वात मार्केटेबल क्रिकेटर आहे, सचिन तेंडुलकर हा एकमेव असा खेळाडू आहे ज्याचा हा दर्जा आहे. अशा परिस्थितीत, आर्थिक दृष्टिकोनातून पाहिल्यास विराट कोहलीला वगळणे कठीण आहे कारण चाहत्यांना त्याला फलंदाजी करताना किंवा मैदानावर पाहायचे आहे.

माजी इंग्लड क्रिकेटपटू मॉन्टी पानेसर म्हणाले की, चाहते विराट कोहलीवर खूप प्रेम करतात, त्याला इंग्लंडमध्येही खूप फॉलो केले जाते. अशात आपण विराट कोहलीचा विचार करतो तेव्हा अनेक गोष्टी मनात येतात.

विराट कोहली जेव्हा खेळतो तेव्हा संपूर्ण स्टेडियम चाहत्यांनी भरलेले असते. मात्र आता बीसीसीआयलाही बसून विराट कोहली भारतीय संघासाठी योग्य आहे का याचा विचार करावा लागणार आहे. विशेष म्हणजे टीम इंडिया सध्या टी-20 विश्वचषकाची तयारी करत आहे. विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे, अशात संघाची तयारी केली जात आहे. अशा स्थितीत विराट कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय आहे, जो गेल्या तीन वर्षांपासून एकही शतक झळकावू शकलेला नाही.

नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यातही विराट कोहलीने चांगली कामगिरी केलेली नाही. दोन टी-20 सामन्यांमध्ये विराट कोहली केवळ 12 धावा करू शकला, तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली 16 धावांवर ऑलआऊट झाला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा