India Vs Zealand
India Vs Zealand Team Lokshahi
क्रीडा

...तर एकदिवसीय मालिका न्यूझीलंडच्या नावे होईल, भारतीय संघाचे वाढले टेन्शन

Published by : Sagar Pradhan

भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. याच दौऱ्यात भारताने टी-20 मालिका जिंकली. मात्र, एकदिवसीय मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव झाला. आज या मालिकेचा दुसरा सामन हॅमिल्टनच्या सेडन पार्कवर खेळवला गेला. परंतु हा सामना पावसामुळं रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता या दोन्ही संघात तिसरा निर्णायक सामना होणार आहे. एकदिवसीय मालिकेत 1-0 नं पिछाडीवर असलेल्या टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना अतिशय महत्वाचा होता. या मालिकेत पहिल्या सामन्यात टीम इंडियाला सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. शेवटचा एकदिवसीय सामना 30 नोव्हेंबरला क्राइस्टचर्चमध्ये होणार आहे. या सामन्यात भारतानं विजय मिळवला तर, मालिका बरोबरीत सुटेल. जर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही पावसानं गोंधळ घातल्यास मालिका न्यूझीलंडच्या नावावर होईल.

भारतीय संघ:

हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

न्यूझीलंड संघ:

फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, मायकेल ब्रेसवेल, ईश सोढी.

Rohit Pawar : देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर त्यात तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

महाविकास आघाडीतील सांगलीच्या वादावर रोहित पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतीला पाठिंबा