व्हिडिओ

Mumbai : भुयारी मेट्रो अडली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घोषणेनंतरही डेडलाइन चुकण्याची चिन्हे

Published by : Team Lokshahi

पश्चिम उपनगरासह दक्षिण मुंबईतील गर्दीला नियंत्रणात आणू शकणाऱ्या मेट्रो 3 या भूमिगत मार्गिकेला विलंब झाला आहे. या मार्गिकेचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 मध्ये सुरू होईल, अशी घोषणा स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र, हा प्रकल्प डिसेंबरची 'डेडलाइन' चुकवणार, अशी स्पष्ट चिन्हे आहेत. मेट्रो 3 या मार्गिकेदरम्यान उत्तर भागात औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्र, तर दक्षिण भागात महत्त्वाच्या हेरिटेज आणि जुन्या इमारती आहेत. पहिला टप्पा डिसेंबर, 2023 मध्ये सुरू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी केली. मात्र पुढील दहा दिवसांत तरी ही मार्गिका सुरू होण्याची चिन्हे नाहीत.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा 14वर; 43 जणांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, दोषींवर कारवाई करण्यासाठी CM शिंदेंनी दिल्या सूचना

T20 वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा घेणार निवृत्ती? हार्दिक पंड्याच्या निवडीबाबत मोठी अपडेट आली समोर

दिनविशेष 14 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मुंबई, ठाणे, रायगडला अवकाळी पावसानं झोडपलं! वादळी वाऱ्यामुळं घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं, ४ जणांचा मृत्यू