Supriya Sule participates in Wari
Supriya Sule participates in Wari team lokshahi
व्हिडिओ

सुप्रिया सुळेंनी वारकऱ्यांसाठी बनवलं पिठलं-भाकरी

Published by : Shubham Tate

विनोद गायकवाड| पुणे

Supriya Sule : जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा दौंड तालुक्यातील पहिला मुक्काम हा यवत गावामध्ये असतो. गेल्या अनेक वर्षांपासून यवत याठिकाणी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या भोजनासाठी पिठलं-भाकरी करण्यात येते. आज या ठिकाणची पाहणी करण्यासाठी खासदार सुळे या आल्या असता त्यांनीही महिलांसोबत चुलीवरची भाकरी आणि पिठलं बनवण्याचा आनंद घेतला. (Supriya Sule participates in Wari)

आज सासवडमध्ये माऊलीची पालखी मुक्कामी तर सोपानकाकांच्या पालखीचं होणार प्रस्थान. परंपरेनुसार चालत आलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलीच्या भेटीनंतर आज दुपारी बारा वाजता सासवड येथून संत सोपानदेवांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. यासाठी देवस्थानच्या वतीने सर्व तयारी करण्यात आली असून आज दुपारी सोपानदेव विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघणार आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातून निघून आज दिवे घाट पार करून पुढे जात आहे. ड्रोनच्या साहाय्याने या पालखी मार्गाचं चित्रीकरण केलं गेलं आहे. माउलीच्या पालखीचे आगमन पुणे ग्रामीण हद्दीत होत आहे. दिवे घाटामध्ये पोलिसांच्या ड्रोनद्वारे केलेले चित्रीकरण आहे.

भक्तिभावपूर्ण वातावरणात विठ्ठलनामाच्या गजरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यातून पुढे मार्गस्थ होत आहे. कोरोनानंतर पालखीमध्ये वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे दिसून येत आहे. भक्तीमय वातावरणामुळे पुणे परिसरात उत्साहाला उधाण आलं. गुरुवारी वारकऱ्यांनी मेट्रो सफरीचाही आनंद घेतला. पुणेकरांचा पाहुणचार घेऊन दोन्ही पालख्या आज पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत.

Labour Day Wishes: ज्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि समर्पणामुळे देश घडला अशा सर्व कामगारांना, कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Marathi Rajbhasha Day: मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देऊन जागवा मराठीचा अभिमान!

Maharashtra Day 2024 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

टी-२० वर्ल्डकपसाठी भारताच्या मुख्य संघात रिंकू सिंगला डावललं, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आवळला नाराजीचा सूर

"काँग्रेसला सत्तेत आणू नका, नाहीतर तुमच्या संपत्तीवर..." PM नरेंद्र मोदींचा जनतेला इशारा