Meta - Virtual Influencer : कोण आहे कायरा?, सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ का?
सध्याच्या काळामध्ये इन्फ्लुएन्सर (Influencer) एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा जास्त चर्चेत असतो. इन्फ्लुएन्सर ही कंसेप्ट आता जास्तच व्हायरल होताना दिसत आहे. 2016 मध्ये सुरूवात झालेल्या या सोशल मिडीया मार्केटिंगला(Social Media Marketing)आताच्या काळामध्ये जास्तचं चर्चा आल्याचं आपण पाहत आहोत.
जग एवढं पुढे गेले असताना आता इन्फ्लुएन्सरचा देखील व्हरचुअल इन्फ्लुएन्सर (virtual Influencer) म्हणून नवीन कंसेप्ट पाहायला मिळत आहे. आपण अनेकदा मेटायुनिव्हर्स हा शब्द ऐकला असेल. मेटायुनिव्हर्स ही कंसेप्ट इंटरनेटच्या (Internet) माध्यमातून भविष्यातील पुनरावृत्तीच्या संकल्पनेचे वर्णन करण्यासाठी वापरली जाते. भारतामधील अभियंता हिमांशू गोयल यांनी नुकतेच एक रोबो अवतार तयार केले आहे. ज्याचा नाव कायरा असे असून ते अवतार सध्या सोशल मिडीयावर (Social Media) व्हरचुअल इन्फ्लुएन्सर म्हणून काम करत आहे.
हिमांशू गोयल हे भारतामधील व्हरचुअल इन्फ्लुएन्सर बनविणारे पहिलेच अभियंता ठरले असून, कायरा ही पहिलीच व्हरचुअल इन्फ्लुएन्सर म्हणून प्रसिध्द होत आहे. सध्या सोशल मिडीयावरा कायराचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (viral) होत आहे. कायरा ही भारतातील पहिलीच व्हरचुअल इन्फ्लुएन्सर ठरली आहे.
टेक्नोलॉजिचा वापर करून आता कल्पनेकडील अनेक गोष्टी आपण प्रत्येकाक्षात उतरवतात येतात. कायराचा हा अवतार देखील टेक्नोलॉजीचा वापर करून बनविण्यात आला आहे. कायरा सोशल मिडीयी आणि डिजीटल मार्कटमध्ये स्वतःहा ट्रेंडचा (Trend) अभ्यास करून त्यानुसार कटेंट क्रियेट करणार आहे. त्याचबरोबर मार्कटमधील नवीननवीन ब्रेंडसोबत टायप करून त्या ब्रेंडचे प्रमोशन देखील कायरा (Kayara) करणार आहे. सोशल मिडीयावर धुमाकूळ घालणाऱ्या कायराचे इंस्टाग्रामवर 1 लाखपेक्षा जास्त फोलोवर्स (followers) आहेत.