Air Hostess Rules
STRICT AIRLINE RULES AIR HOSTESSES MUST FOLLOW OR RISK THEIR CAREERS

Air Hostess Rules: एक चूक आणि करिअर धोक्यात! एअर होस्टेसना कधीही करता येत नाही 'हे' काम

Travel Awareness: एअर होस्टेस आणि क्रू मेंबर्ससाठी विमान कंपन्यांकडून अत्यंत कडक नियम लागू असतात. परफ्यूम, धुम्रपान, च्युइंग गम यांसारख्या गोष्टींवर बंदी आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

विमानातून प्रवास करताना प्रवाशांना अनेक नियमांचे पालन करावे लागते, पण क्रू मेंबर्सवरही तितकेच किंबहुना अधिक कडक नियम आहेत. एअर होस्टेस, पायलट आणि इतर क्रू मेंबर्सना परफ्यूम लावण्यापासून धुम्रपान आणि च्युइंग गम खाण्यापर्यंत अनेक गोष्टींवर पूर्ण बंदी आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाते, असे विमान कंपन्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद आहे.

Air Hostess Rules
KDMC: कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी

एअर होस्टेस प्रवाशांच्या सेवेसाठी नेहमी तयार असतात, पण त्यांना कोणताही परफ्यूम लावता येत नाही. तीव्र सुगंधामुळे क्रू मेंबर्सचे लक्ष विचलित होण्याची शक्यता असते, म्हणून ही बंदी आहे. याचबरोबर सॅनिटायझर, माऊथवॉश, टुथपेस्ट किंवा अल्कोहोल असलेली कोणतीही उत्पादने वापरता येत नाहीत. अल्कोहोल ज्वलनशील असल्याने आणि त्याच्या वासामुळे नकारात्मक प्रभाव पडण्याची भीती असल्याने ही मनाई आहे.

Air Hostess Rules
Satara Sahitya Sammelan: साताऱ्यात ३२ वर्षांनी भरणार साहित्य मेळा, ९९ व्या साहित्य संमेलनाला साताऱ्यात आजपासून सुरूवात

डीजीसीएच्या (डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल ॲव्हिएशन) नियमानुसार, क्रू मेंबर्सना एखादे औषध घ्यायचे असल्यास विमानात चढण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. औषधामुळे विमान हवेत असताना कामावर परिणाम होणार नाही, याची खात्री करून घेतली जाते. विशेषतः पायलट, एअर होस्टेस आणि इतर क्रू मेंबर्सना विमानात धुम्रपान किंवा तंबाखूचे सेवन पूर्णपणे बंदी आहे. च्युइंग गम खाण्यासदेखील मनाई आहे, ज्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होते.

Air Hostess Rules
Pandharpur: पंढरपूरात मोठा निर्णय! विठ्ठल मंदिर आणि परिवार देवतांच्या ३७ मूर्ती बदलणार

हे नियम सुरक्षितता आणि एकाग्रतेची खात्री करण्यासाठी आहेत, ज्यामुळे प्रवाशांचे प्रवास सुरक्षित राहतात. विमान कंपन्या या नियमांचे काटेकोरपणे पालन करतात.

Summary
  • एअर होस्टेस व क्रू मेंबर्सवर कडक नियम लागू

  • परफ्यूम, धुम्रपान आणि च्युइंग गमवर पूर्ण बंदी

  • औषध घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला बंधनकारक

  • प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com